विद्यार्थी, गावऱ्यातून समाधान ; शालेय मुलांची होत होती गैरसोय…
खानापूर : लोकहित न्यूज
तब्बल 75 वर्षे बसच्या प्रतिक्षेत असलेल्या किरावळे ( ता.खानापूर) गावात आ. विठ्ठल हलगेकर यांच्या प्रयत्नातून बस धावली अन् गावात एकच नवचैतन्य निर्माण झाले आहे. आधीच जंगल प्रदेशात येणाऱ्या या गावात अनेक मोठ्या समस्यांस्पैकी वाहतूक व्यवस्था हीही मोठी समस्या होती. ती इतकी वर्षे गावाला सतावत होती. अखेर आ. हलगेकर यांनी जोर लावल्याने बस व्यवस्थापकांना बस सोडावीच लागली. ही समस्या दूर झाल्याने विद्यार्थी गावकऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात येत असून , आमदारांचे अभिनंदन करण्यात येत आहे. याकामी ग्राम पंचायत अध्यक्षा स्वाती गुरव, उपाध्यक्ष अमोल बेळगावकर, सामाजिक कार्यकर्ते पंकज कुट्रे, कृष्णा पाटील व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.
Leave a Reply