विद्यमान संचालक अरविंद पाटील, राजू सिदानी यांचाही प्रचार जोरात; आ. विठ्ठल हलगेकर, माजी आ. डॉ. अंजली निंबाळकर यांच्या भूमिकेकडे लक्ष…
खानापूर: लोकहित न्यूज
निवडणूक जवळ येऊ लागली तशी जिल्हा मध्यवर्ती (डीसीसी) बँकेच्या राजकारणात अधिकच रंगत येवू लागली आहे. प्रथमच राज्यस्तरीय दिग्गजांच्या समावेशामुळे यंदाची निवडणूक सोपी नसणार हे मात्र, पक्के! तरीही ऐनवेळी कोण कोणावर भारी पडू शकेल हे सांगणे मात्र, कठीणच म्हणावे लागेल. कारण, राजकरणात कोण कुणाचा मित्र आणि दुश्मन होईल हे गणित त्या त्या वेळी जुळून येतेच. त्यामुळें कोण कुठे? हे अताच सांगणे घाईचे ठरेल. अशीच स्थिती खानापूर डीसीसी बँक निवडणुकीबाबत आहे. सद्या विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी गेल्या दोन महिन्यांआधीच तालुक्यात आपली फिल्डींग लावल्याने ते सद्या तरी त्यांची बाजू भक्कम असल्याचे चित्र आहे. हट्टीहोळी यांच्या दाव्यानुसार 57 पैकी 30 कृषी पत्तीन (सोसायट्या) संघ पूर्णपणे संपर्कात असून, त्यांचा पाठींबा नक्कीच मानला जात आहे. तर दुसरीकडे विद्यमान संचालक अरविंद पाटील यांना कमी लेखणे मूर्खपणाचे ठरेल, कारण ,खानापूर तालुक्याच्या राजकारणाची दुसरी बाजू म्हणजेच अरविंद पाटील असे गणित नेहमीच दिसून येते. त्यामुळें पाटील यांचीही तयारी पक्की दिसत आहे. तर गर्लगुंजी पीकेपीएसचे चेअरमन राजू सिदाणी यांचीही तयारी जोरात सुरू आहे. सिदानी म्हणतात माझाही तालुक्यातील बहुतेक सोयट्यांच्या संचालांसमवेत बैठका झाल्या असून , मोठा पाठिंबा मिळत आहे. तिन्हीं उमेदवारांचे दावे -प्रतिदावे होत असले तरी विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर आणि माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. हे दोन नेतेच ऐनवेळी ‘किंगमेकर’ ठरण्याची चिन्हे आहेत.
…..कोण कुणाला शह देणार? कोण कुणाला पाठींबा देणार…
सद्या तरी विद्यमान संचालक मा. अरविंद पाटील, विधान परिषद सदस्य चनराज हट्टीहोळी, राजू सिदानी हे तीन उमेदवार रणांगणात आहेत, मा. आ. डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडून उमेदवार देणार की, त्या स्वतः उभे राहणार? की कोणाला पाठींबा देणार याबाबत अद्याप तर त्यांनी कोणती भूमिका स्पष्ट केलेली नाही. निंबाळकर यांचाही कृषी पत्तीन संघाशी चांगला संपर्क आहे. मागच्या निवडणुकीत त्यांनी विद्यमान संचालक अरविंद पाटील यांना कडवी झुंज दिली होती. ऐनवेळी दोन मते पाटील यांच्या बाजूने पडल्याने ते विजयी झाले होते. त्यामुळें डॉ. निंबाळकर यांचीही भूमिका मोलाची ठरू शकते. दुसरीकडे विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर यांनी अद्याप तरी शांतच आहेत, ऐनवेळी ते कोणती भूमिका घेतात हे येणारा काळच सांगेल, पण, सद्या तरी ते राजू सिदानी यांच्या पाठीशी आहेत असे गृहीत धरले तर वावगे ठरणार नाही. यावेळी महत्वाचे म्हणजे एकमेकाला’ शह ‘ अर्थात पराभूत करण्याच्या नादात काँग्रेस असो वा बीजेपी हा पक्षभेद बाजुला ठेवूनच राजकारण होण्याचे चिन्हं आहे. कारण, मा. आ. विद्यमान संचालक अरविंद पाटील आणि विद्यमान आ. विठ्ठल हलगेकर यांच्यात नाराजीचे सूर असल्यामुळे हलगेकर यांच्याकडून राजू सिदानी यांची उमेदवारी कायम ठेवणार की, कोणाला पाठींबा देणार हा प्रश्न आहे. अशीही चर्चा आहे की, हलगेकर हे स्वतःही उभे राहू शकतात . तर दुसरीकडे निवडणूक जवळ येताच आणखी काहीं बदल होवू शकतात. माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी यांनी जाहीर केल्याप्रमाणे जारकीहोळी बंधू जर का? अरविंद पाटील यांच्या मागे उभे राहिले तर ऐनवेळी काय होवू शकेल हेही सांगणे कठीणच म्हणावे लागेल! मात्र, हे राज्यातील राजकारणावर अवलंबून असेल, तेथील वातावरण शांत तर डीसीसीही शांतच असे असे चित्रं असु शकते! राज्यात मध्येच मुख्यमंत्री बदलाचे मध्येच वादळ उठले होते, ते तूर्तास तरी शांत झाल्याचे दिसत आहे. कारण, डि .के शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात सर्वकाही अलबेल आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. हे दोन गट राहणारच, असे असले तरी दोघांकडूनही सोयीनुसार राजकारणाचा डाव साधला जाणार हेही तितकेच खरे आहे. त्याचाच परिणाम खानापुरातील डीसीसीच्या राजकरणात दिसून येईल.
…..लवकरच मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे तालुक्यात जनसंपर्क कार्यालय…
राज्याच्या बालकल्यानमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे जनसंपर्क कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. लक्ष्मीताई सौहार्द सोसायटीची शाखा खानापुरात उघडण्यात येणार असून, त्याच ठिकाणी हेही कार्यालय असणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळें हेब्बाळकर यांच्या बेळगांव ग्रामीण भागात झालेल्या विकासाचे मॉडेल खानापुरात का? नाही चालणार असाही प्रश्न आहे. कारण तालुक्यातील जनता स्थानीक नेत्यांच्या रोजच्या राजकरणाला कंटाळल्याचे बोलले जात आहे. त्यामुळें त्यांना बदल हवा आहे, असाही सूर ऐकू येत आहे. कारण, लक्ष्मी हेब्बाळकर या स्वतः मंत्री तर त्यांचे भाऊ चंनराज हट्टीहोळी हे विधान परिषद सदस्य आहेत, या दोघांच्या माध्यमातून खानापुरात बहुतेक ठिकाणी विकास झालेला आहे, त्यामुळे त्यांचे तालुक्यात नाव आहे. याचा यावेळी त्यांना फायदा होण्याचे चिन्हं दिसू लागले आहे.
प्रतिक्रिया –
मी माझ्या आणि मंत्री लक्ष्मीताईंच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील समस्या सोडवत आहोत, कोणीही आमच्याकडे समस्या घेवून आले तर त्यांचे समाधान होतेच. पंचायतीच्या माध्यमातून कोटींचा फंड दिला आहे, तर दोन वर्षांपासून खानापुरातील कृषी पत्तींन संघाशी आमचे जवळचे नाते आहे. त्यामुळें ते यावेळी नक्कीच उपयोगी पडू शकते, यात तिळमात्र आहे नाहीं. शिवाय लक्ष्मीताई स्वतः कृषी पत्तींन संघांशी संपर्क साधत आहेत, त्यामुळे त्यांच्या हाकेला नाहीं असे होणारं नाही याचा मला पूर्णपणे विश्वास आहे…
-चन्नराज हट्टीहोळी, विधान परिषद सदस्य.

Leave a Reply