,

….एकत्र आलोय,एकत्र राहण्यासाठी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…


राज ठाकरे – उद्धव ठाकरे यांच्या एकत्र मेळाव्यातून विरोधकांना सूचक टोला ..

मुंबई ( वरळी, डोम) : लोकहित न्यूज

        गेल्या वीस वर्षांपासून दोन्हीं ठाकरे एकत्र, एकाच मंचावर दिसून आले. एकत्र आहोत, एकत्र राहण्यासाठी असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले.  निमित्त होते शिवसेना (उबाठा) आणि मनसे या दोन्हीं पक्षांच्या एकत्र मेळाव्याचे. त्यावेळी  ते बोलत होते. बाजुला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना, माजी मुख्यमंत्री उद्धव म्हणाले की, आम्हीं मराठी माणसांच्या रक्षणासाठी एकत्र आलो आहोत, विरोधक सांगताहेत माझ्या मुख्यमंत्री काळात हिंदी सक्तीला सुरवात झाली म्हणून, त्यांनी दाखवून द्यावे, सिद्ध दाखवावे असेही आव्हान त्यांनी विरोधकांना केले. मुंबईतील सर्व उद्योग पळवले दुसरीकडे, मुंबईत अधिक जमिन ही अदानीच्या ताब्यात कोणी दिली असा घणाघात त्यांनी केले . शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास हे सरकार अपयशी ठरले असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलतांना स्पष्ट केले.

..फक्त मोर्चाच्या चर्चेने हिंदी सक्ती मघार घ्यावी लागली: राज ठाकरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युती सरकारने पहिलीपासूनच हिंदी ही तिसरी भाषा असेल अशी सक्ती असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यामुळें लहानग्या चिमुरड्यांवर ते एक ओझे होईल अशी सर्वत्र चर्चा रंगली आहे. तेवढ्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या भाऊंनी एकत्र येवून हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढण्याची योजना आखली होती. फक्त या चर्चेने सरकारला हिंदी सक्ती माघार घ्यावी लागली, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. पुढे, बोलतांना ते म्हणाले की, मोर्चा व्हायला हवा होता, कळल असत मराठी मानस कसा एकवटो रे! मी आणि उद्धव आज वीस वर्षानंतर एकत्र येत आहोत, आमच्या वादापेक्षा महाष्ट्राचे हित मोलाचे आहे, आजपर्यंत हिंदू हृदय सम्राट कै.बाळासाहेब ठाकरे यांना जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करुन दाखवले असेही खोचक वाक्य राज यांनी उद्गागारले.

यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा. संजय राऊत, आ. जितेन्द्र आव्हाड, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, महादेव जाणकार ठाकरे कुटुंबीय, लाखो कार्यकर्ते, समर्थक उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *