चोर्ला मार्गावर धूम स्टाईलने दुचाकी चालवणारा युवक कंटेनरच्या धडकेत  ठार, तर एक जण गंभीर जखमी…


हब्बनहट्टी फाट्याजवळ सायंकाळीं चारच्या सुमारास घडली घटना..

जांबोटी:: लोकहित न्यूज

     सुट्टीच्या रविवारची मज्जा घेण्याच्या नादात युवकाने आपला प्राण गमावल्याची घटना जांबोटी – चोर्ला मार्गावरील हब्बनहट्टी फाट्यावर घडली . दर्शन चव्हान ( वय.21) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेला राजू क. शिरपूर हाही गंभीर जखमी झाला आहे. अधिक माहिती अशी की, के. ए.22, एए – 9574 हे कंटेनर बेळगावच्या दिशेने जात होते. त्याच्या समोरून येणाऱ्या केए – 63 ए एक्स 24 59 ही दुचाकीला गोव्याकडे जात होते. त्याचवेळी जोरदार वेगाने चाललेल्या दुचाकीने कंटेनरला जोरदार धडक दिल्याने त्यातील एक जण जागीच ठार झाला तर मागे बसलेला  गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून, त्यांच्याकडून तपास करत आहेत.

…,..रंगाचा बेरंग नको; स्वस्तात जीव का? घालवता…

      रविवारसह सर्वच दिवस कॉलेजच्या नावाखाली जांबोटी भागांत मज्जा घेण्यासाठी येणाऱ्या युवकांची मोठी संख्या आहे. त्यांच्याकडून जोरदार वाहन चालवणे, रस्त्यावरच जोरदार आरडाओरड करत डूलडबाजीचे प्रकार घडताना दिसतात. परंतु, आनंदाच्या रंगाचा बेरंग कधी ? होईल याचा नेम नाही. असेच आजतागायत या मार्गावर होतांना दिसत आहे . पण, तरीही युवकांच्या वागण्यात कोणताच फरक पडताना दिसत नाही. आत्ता तरी युवकांनो सुधारा!  स्वस्तात जीव का घालवता? अशा प्रतिक्रीया स्थानिकातून व्यक्त होत आहेत…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *