शासनाने तत्काळ भरपाई देण्याची मागणी..
खानापूर: लोकहित न्यूज
हलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या मेरडा ( ता. खानापूर) येथील तुकाराम परशराम सुत्तार यांचे राहते घर पावसामुळे पडून अंदाजे साडेसात लखांची नुकसान झाल्याची घटना मंगळवारी ( 24 ) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. सुतार हे गणेश मूर्तिकार म्हणून परिचित आहेत, सदर घरी ते चिखलाच्या गणेश मूर्ती बनवत होते. परिणामी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांचे घर खचत चालले होते. अखेर मंगळवारी संपूर्ण घरच कोसळले. त्यामूळे त्यांना राहण्यासाठी समस्या निर्माण झाली आहे. ग्राम पंचायतीतर्फे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य महाबळेश्वर पाटील यांनी घटनेची पाहणी करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची हमी दिल्याची माहिती, नुकसानग्रस्त नागरीक तुकाराम सुतार यांनी ‘लोकहित न्यूज ‘शी बोलताना दिली. तरी ग्राम पंचायत आणि तहसीलदार खात्याने तत्काळ पंचनामा करून नुकसाभरपाईची मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.







Leave a Reply