जांबोटी माध्यमिक विद्यालयातील 2006-07 बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा..
जांबोटी: लोकहित न्यूज
आजच्या धावपळीच्या जीवनात आनंद कुठे? शोधायचा असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो. स्वार्थीपणाच्या दुनियेत दोस्ती हे एकमेव नाते निव्वळ आणि निर्मळ स्वछ पाण्यासारखे असते. तोच धागा विणण्याचा अनुभव जांबोटी भागातील केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या 2006- 07 च्या बॅचच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतला. तब्बल 18 वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी ताज्या करत एक दिवसाची शाळा भरवून त्या काळातील विद्यार्थ्याची भूमिका घेतली होती.
विद्यार्थांना घडवणे हीच शिक्षकांची खरी संपती..
निवृत्त प्राध्यापक एस. जी. शिंदे व मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी त्या काळातील!छडी लागे छमछम विद्या येई घम घम! चा अनुभव देताना विद्यार्थांना चांगले शिक्षण देणे हीच शिक्षकांची खरी संपती आहे, असे यावेळी बोलतांना सांगितले. पुढे बोलताना दोन्हीं मुख्याध्यापकांनी सांगितले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध असून, ते एकदा का अंगात शिरले की व्यक्तीचे जीवन सार्थकी लागते. आज यातील विध्यार्थी अनेक मोठमोठ्या हुद्यावर गेले आहेत तर कोणी लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या समोर आले की, मोठें कौतुक वाटते. या बॅचच्या विद्यार्थांनी तर आम्हाला खूप आनंद दिला आहे. ते विद्यार्थी आज इतक्या वर्षानंतर तुम्हीं एकत्र यायचे औचित्य साधला आहात ते कौतुकास्पद आहे.. असेही मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी ताज्या केल्या बालपणीच्या आठवणी…
त्याकाळी विद्यार्थी दशेत कोणालाही काहीच समजलें नसेल, पण आज 18 वर्षानंतर जमलेल्या विद्यार्थांना 2006-07 च्या काळात गेल्याची अनुभूती आली. इतक्या काळानंतर एकत्र आलेल्या मित्र – मैत्रिणींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सर्वांनी एकमेकाचे स्नेह वृद्धिंगत केले. शाळेच्या निमित्ताने का होईना इतक्या वर्षांची विचारपूस करण्याची जणू नामी संधी उपलब्ध झाली होती. त्याचे सोने करत सर्वांनी खूप आनंद घेतला. सौनिकात दाखल झालेल्या हौशी व्यक्तीमत्व म्हणून ओळख असणाऱ्या प्रशांत कुर्लेकर , संदीप हळब, राहुल डांगे यांच्या प्रयत्नाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थिनी स्मिता पाटील यांनी आपला अनुभव सांगताना प्रथमतः आयोजकांचे आभार मानले. आजच्या स्नेह मेळाव्यामुळे मला त्या काळात गेल्याचा अनुभव येत असून, तुम्हीही त्याचा अनुभव घ्या असे आवाहन त्यांनी आपल्या सवंगड्यांना केले. तत्कालीन विद्यार्थी व आताचे लोकप्रतिनिधी म्हणून ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठनकर यांच्यासह विविध हुद्यावर तसेच बाहेर देशात कामाला असणारे माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply