वंदे मातरम् भारत रेल्वे धारवाडहून बेळगांवला लवकरात लवकर जोडा …

विधान परिषद सदस्य इरांणा कडाडी, खा. जगदीश शेट्टर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी..
नवीदिल्ली: लोकहित न्यूज
जलद धावणारी वंदे मातरम् भारत रेल्वे धारवाडहून बेळगांवपर्यंत लवकरात लवकर सूरू करा, सदर रेल्वे सेवा कधी सुरू होणार याची तारीखही तत्काळ जाहीर करावी अशी मागणी बेळगांव विधान परिषद सदस्य इराणा कडाडी, व खा. जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विन वैशपायन यांच्याकडे केली. तसेच मुंबई – होसपेटे व सोलापूर होसपेटे रेल्वेसेवा बळारी रेल्वे स्टेशनला जोडा अशीही यावेळी मागणी करण्यात आली. त्यावर रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ पाठपुरावा करण्याची हमी दिली. यावेळी केंद्रीय प्रल्हाद जोशी यांनीही उपस्थित होते.
