जागतिक महिलादिनीच खानापूर सरकारी दवाखान्यात महिलेकडून पैशे उकळण्याचा प्रयत्न ….
खानापूर: लोकहित न्यूज नेटवर्क
सरकारने कोटींचा निधी खर्च करून खानापुरात बांधलेल्या सरकारी दवाखान्यात रुग्णांकडून चक्क 7000 हजारांची मागणी डॉक्टरांनी केल्याची तक्रार मा. आ. डॉ. अंजली निंबाळकर यांच्या कार्यालयात रुग्णांकडून करण्यात आली आहे. लागलीच ही माहिती आ.निंबाळकर यांच्या कानी पडताच त्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यावर सारवासारव करतांना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.
गस्टोळी ( ता. खानापूर) येथील बाळंतीनीकडून दवाखाना
सोडते (डीसचार्ज) वेळी डॉक्टरांकडून 7000 हजाराची मागणी केल्याची तक्रार मा. आ. डॉ. अंजली निंबाळकर यांच्या खणापुरातील कार्यालयात करण्यात आली. व ही माहिती डॉ.निंबाळकर यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ डीएचओ महेश यांच्याशी संपर्क साधून चांगलाच जाब विचारला. यापुढे असे प्रकार थांबले नाहीत तर लोकायुक्त,आरोग्य मंत्र्याकडे तक्रार करण्यात येईल, अशीही तंबी डॉ.निंबाळकर यांनी
दिली. त्यावर अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. विनामूल्य सरकारी दवाखान्यात असे प्रकार सुरू असतील तर अशा अधिकाऱ्यांना करावे तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सामान्य नागरिकांनी काय? करावे,कुणाकडे न्याय मागावा हाही मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे. याकडे आमदार विठ्ठल हलगेकर, खा. विश्वेस्वर केगेरी -हेगडे यांनी लक्ष देण्याची गरज आहे..
प्रतिक्रिया –
अशी तक्रार आली माझ्याकडे, यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची दखल घेण्यात येईल. सबंधित डॉक्टरांना तशी सूचना केली आहे.
Leave a Reply