येत्या काहीं दिवसांत अती उकाडा; नागरिकहो आरोग्य सांभाळा!


(लोकहित आरोग्य न्यूज )

भारतीय हवामान विभागाची सूचना; अती आवश्यक असेल तरच बाहेर पडावे….

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

        यंदाच्या कोरड्या हवामानाने निचांकी गाठली असून, सकाळी एक, दुपारी एकप्रकार तर सायंकाळी वेगळेच वातावरण सध्या पहायला मिळत आहे. अलिकडच्या काळात त्यामध्येही अधिकता वाढणार असून, उष्णतेचे प्रमाण तीव्र होणार असल्याने नागरिकांनी आरोग्य सांभाळावे, आवश्यक काम असेल तरच बाहेर पडावे, अन्यथा बाहेर पडणे टाळावे असे आवाहन भारतीय हवामान खात्याने केले आहे.

      खानापुर महसूल (तहसीलदार) विभागाने तसे पत्रक जाहीर केले असून, त्यामध्ये काहीं सूचना देण्यात आल्या आहेत.

     

परिणाम काय होताहेत….

      गेल्या दोन आठवड्यापासून उष्णतेची लाट सुरू असून, त्यात येत्या काळात अधिकच भर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी अती उन्हाच्या तडाख्यात सापडल्यास चक्कर येणे, प्रभावी हिट स्ट्रोकची लक्षणे जाणवत आहेत, यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता जाणवते, अशक्तपणा जाणवू लागतो असे परिणाम होतात.

बचावासाठी काय खबरदारी घ्याल…

     -दुपारी 12 ते 3 यावेळेत अनावश्यक बाहेर जाणे टाळावे.

  -भरपूर पानी प्या, लिंबू,सरबत, नारळपाणी यासारखे द्रव पदार्थ प्यावेत.

-बाहेर जाताना छत्री, टोपी, डोके झाकण्यासाठी कपड्याचा वापर करावा.

-लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिलांना तीव्र उष्णतेपासून वाचवावे.

-हलके, पांढरे फिकट रंगाचे कपडे घालणे चांगले राहील.

-अस्वस्थता, चक्कर येणे किंवा हिट स्ट्रोकची लक्षणे जाणवल्यास त्वरित जवळील आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व शासकीय विभाग, ग्राम पंचायतींना अशा सूचनांचे पत्रक जारी करण्यात आले असून, तशी जागृती करा असा आदेश तहसीलदारांनी बजावला आहे.

  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *