तालुका काँग्रेसचे आमदारांवरील आरोप बालिशपणाचे: विकास आघाडी अध्यक्ष भरमानी पाटील


व्हिडीओच्या माध्यमातून दिला कामांचा हिशोब; न होणारी कामे आ . हलगेकर यांनी केल्याची पाटील यांची माहिती

  खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर )

             सोमवारी तालुका ब्लॉक काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यावर निशाणा साधला. पण, ते बालिशपणाचे लक्षण म्हणावे लागेल. कारण आ.  हलगेकर यांनी तालुक्यात न होणारी कामेही केली असून, आतापर्यंत तालुक्यात झालेल्या लक्ष्मी यात्रांसह ग्राम यात्रा या त्यांच्याच माध्यमातून झाल्या आहेत, असे प्रत्युत्तर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांनी दिले. खानापुरातील मयेकर नगरच्या रस्त्यावर उभे राहून ही माहिती देतानाचा त्यांचा व्हिडिओ सोसियल मीडियादवर व्हायरल होत आहे.

   

काय म्हणतात भरमानी पाटील …

        तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून बोलतांना, आमदारांच्या अनेक विकासकामांची माहिती दिली आहे. तालुक्यात पार पडलेल्या लक्ष्मी यात्रा हा तालुकावासियांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यामुळे याची दखल घेत जिल्हा आणि राज्यस्तरीय प्रयत्न करून यात्रांसाठी अनुदान मिळवून दिले आहे. त्यातून विकासही साधला आहे, त्याची पाहणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे. खानापूर येथील महत्वाची वस्ती समजल्या जाणाऱ्या मयेकर नगरचा रस्ता चकाचक केला आहे, राजा स्टाईल रस्त्यासाठी केंद्राकडून निधी मंजूर घेतला, ते काम सध्या प्रगतीपथावर आहे. यापूर्वी या रस्त्याकडे कोणीही पाहिले नव्हते, अती दुर्दशाजन्य हा रस्ता होता. रामगुरवाडी रस्ता, शहरातील मारूती नगरचा रस्ता, खानापूर रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता, तालुक्यात अमृतुल्य पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर आहे , उगाच आम्हीं खरे आणि दुसरे खोटे असे दाखवून तालुक्यातील लोकांना गुमराह करू नये असे, उत्तर देतानाच राज्यात तुमचे सरकार आहे तुम्हीही एखादे काम आणून नारळ फोडा की असेही भरमानी पाटील यांनी पुढे बोलतांना स्पष्ट केले.

चौकट

घागरीतील कमी पाणी कसे पुरवायचे हे आ. हलगेकर यांच्याकडुन शिकावे….

        कमी पाणी असलेल्या घागरीतील कमी पाणी कसे पुरवायचे हे आ. हलगेकर यांच्याकडुन शिकावे, अर्थात काय? तर कमी फंडात जास्त विकास करणे होय असे भरमानी पाटील यांच्या बोलण्यातून अर्थ निघतो..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *