आमदार विठ्ठल हलगेकर यांची माहिती; प्रभूनगर येथील विहिरीची पूजा करून देवाचीहट्टी- बैलूर, बैलूर सिद्धनाथ मंदिर ते बाकनूर रस्त्याचे पूजन होईल…
देवाचीहट्टी:: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
देवाचीहट्टी -बैलूर मधील एक किलो मीटरच्या रस्त्यासह बैलूर सिद्धनाथ मंदिर ते बाकनूर रस्त्याची उद्या लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते पूजन होणार आहे. या दोन्हीं रस्त्यांसाठी कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्याचा विनियोग व्यवस्थित करा असा आदेश बांधकाम खात्याला बजावल्याची माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली. तरी भागातील भाजप कार्यकर्ते व गावकऱ्यांनी उद्या उपस्थित रहावे असे आवाहन आमदार हलगेकर यांनी केले आहे.
सकाळच्या सत्रात प्रभूनगर येथील विहिरीचे पूजन करुन आमदार हलगेकर यांनी जांबोटी बैलूर दौरा करतील. आज तालुक्यातील सात ठिकाणी त्यांच्याहस्ते रस्ते, यात्रा नियोजन विकासकामांचे पूजन करण्यात येत आहे. तालुक्यात आमदार काय करतात असा जरी मतप्रवाह असला तरी त्यांनी कोटींचा निधी त्यांनी मंजूर करून आणला आहे. काँग्रेस सरकारच्या पंचहमी योजनांमुळे विकासाची गती कमी झाल्याची माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली. उद्या बैलूर भागातील नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे…






Leave a Reply