पोलिसांचा तपास सुरू; सीपीआय गवंडी, स्पेशल स्कॉडचा तपास सुरू…
जांबोटी:: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
जांबोटीपेठेत कालच्या सुमारास मारुती हळब यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार घडला असून, तपासामध्ये अद्याप तरी काहीच हाती लागले नसल्याचे सीपीआय गवंडी यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना सांगितले. त्यामुळे ही चोरी एक रहस्य बनून राहिली असून, सध्या याचा तपास सोशल स्कॉड, श्वानपथकडून सुरू आहे. सीपीआय गवंडी स्वतः जांबोटी पोलीस स्थानकात दाखल झाले असून, त्यांच्याकडूनही कसून तपास सुरू आहे.
मारुती हळब यांच्या म्हणण्यानुसार साडेतीन तोळे सोने व काही रक्कम चोरीला गेल्याची माहिती….
याबाबत लोकहित न्यूजने माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, मारुती हळब यांनी आपण बायकोला दवाखान्याला घेऊन गेलो होतो, त्यानंतर हा प्रकार कधी घडला घडला, हे आपल्याला माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. घरातील साडेतीन तोळे सोने व काही रक्कम चोरीला गेल्याचे मारुती हळब यांचे म्हणणे. पण, सीपीआय गवंडी यांच्याशी लोकहित न्यूजने चर्चा केली असता, असा कोणताच प्रकार आमच्या नजरेस आला नसून, पूर्वनियोजित हा प्रकार आहे का? याचा तपास आम्हीं करत आहोत, जे काहीं सत्य असेल ते सर्वांसमोर आणले जाईल असेही ते म्हणाले.
गावात एकच खळबळ; चावी बाजूला ठेवली होती अशीही माहिती कितपत खरी याचा तपास सुरू…
चोरीच्या या घटनेचा माहिती वाऱ्यासारखी गावभर पसरली असून, घरची चावी बाजूला ठेवली होती अशीही माहिती समोर येत असून, हा चोरीचा प्रकार असेल तर असे काहीं दिसेना असे पोलिसांचे म्हणणे आहे… ते कितपत योग्य आहे,की, पोलिसही हे प्रकरण स्थानिक पातळीवर दाबण्याचा प्रयत्न करत आहेत असाही संशय वर्तविण्यात येत आहे… सध्या स्पेशल स्कॉड, श्वानपथकडून तपास सुरू असून, खरी काय ती माहिती काही क्षणातच उघडकीस येईल….






Leave a Reply