July 21, 2026

आमदार हलगेकर ‘सरांचे ‘रक्तदान शिबीर ठरणार अनेकांना ‘वरदान ‘

0
IMG-20260102-WA0109.jpg

उद्या हब्बनहट्टी (जांबोटी) श्री. स्वयंभू मारूती तीर्थक्षेत्रावर जमा होणार ब्लड बँक …

हब्बनहट्टी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

      सध्याचा धावपळीच्या काळात दान आणि दानशूरतेची मानसिकता खूप कमी प्रमाण पहायला मिळते. पण, अजूनही माणुसकी जीवंत असल्याची काहीं उदाहरणे देता येतील. तोच धागा पकडत आणि तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर ‘सर’ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, त्यांच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवार दिनांक 7 जानेवारी रोजी हब्बनहट्टी (जांबोटी) तीर्थक्षेत्रावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये अनेक युवक, नागरिक आपले रक्तदान करणार आहेत, सध्या देश, राज्य आणि जिल्ह्यात विविध आजारांवर मात करण्यासाठी रक्ताची नितांत गरज भासते, त्यामुळे उद्याचे आमदारांचे हे शिबिर अनेकांचे जीवदान ठरणार आहे. त्यामुळे तालुक्यातून या उपक्रमाचे कोड कौतुक होत आहे. त्यासाठी जांबोटी विभाग भाजप युवा नेते गेल्या आठवड्यापासून जागृती करत आहेत. भाजपचे युवा नेते दौलतराव कोलीकर, सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत, कृष्णा भरणकर, विलास गायकवाड, सचिन साबळे, पवन गायकवाड, मंगेश मुळीक यांच्यासह सर्वच मंडळी या समाजाभिमुख कार्यात व्यस्त आहे. तरी कोणाला या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करायचे असल्यास त्यांनी उद्या स्वयंभू मारूती हब्बनहट्टी तीर्थक्षेत्रावर उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

दुपारनंतर आमदार शनिनिकेतनमध्ये शुभेच्छा स्वीकारतील…

    हब्बनहट्टी येथील रक्तदान शिबीर संपल्यानंतर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर सर दुपारच्या सत्रात खानापूरातील शांतिनिकेतन स्कूलमध्ये उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारतील असेही कळविण्यात केले आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *