स्वतःला तिकीट मागायची इथपर्यंत सुरू झालेला प्रवास तिकीट वाटपार्यंत…


माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांचा राष्ट्रीय मजल ; पाँडिचेरीसाठी तिकीट वाटपा संदर्भात राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची बैठक दिल्लीत पडली पार…

दिल्ली: लोकहित न्यूज नेटवर्क (विलास कवठणकर)

    पुढील वर्षी अर्थात 2026 साली होऊ घातलेल्या पाँडिचेरी राज्यातील राज्यसभा निवडणुकीची  काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे, त्यासाठीच आज दिल्लीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस निवडणूक तिकीट सिलेक्शन कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अध्यक्षस्थानी होते. खासदार राहुल गांधी, खासदार वेणुगोपाल, प्रभारी गिरीश चौंडनकर, टी . एस.देव सिंग, खासदार जी. सी. चंद्रशेखर, खासदार अनिलजी, सचिव निवेदित अल्वा, व्ही. वैथनाथन , ,पीसीसी वैथलिंगम आदी मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये खानापूरच्या माजी तथा अखिल भारतीय काँग्रेस सचिव आमदार डॉ अंजली निंबाळकर याही उपस्थित होत्या. यात अभिमानास्पद म्हणजे एकच गोष्ट की, ज्या व्यक्ती एकेकाळी स्वतःला तिकीट मागायच्या त्याच खानापूरच्या माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर अखिल भारतीय काँग्रेस सचिव या नात्याने पक्षाचे तिकीट अर्थात उमेदवारी केंद्रीय काँग्रेस निवड समितीतून वाटताहेत अर्थात उमेदवारी देण्यापर्यंत त्यांची मजल गेली! यालाच म्हणतात पक्षप्रेम आणि पक्षात आपले स्थान घट्ट करणे, ही मजल खानापूर तालुक्याचा अभिमान उंचावणारी म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

डॉ अंजली निंबाळकर यांच्यावर गोवा, दिव दमणचीही जबादारी…

     अभ्यासू आणि प्रभावी, पक्षनिष्ठा पाहून माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांच्यावर मुख्य म्हणजे गोवा राज्याची जबाबदारी तर दीव दमण राज्यांचेही त्या नेतृत्व करताहेत, इतका विश्वास त्यांच्यावर राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधीं व त्यांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवला आहे. त्यामुळेच त्यांचे पक्षात स्थान मोलाचे ठरले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *