अखेर ठरले तर मग ‘अरविंद पाटलांचे’ जांबोटीचे ‘शिलेदार’ !


जांबोटी कृषी पत्तीनसाठी 25 उमेदवार रिंगणात ; अरविंद पाटील पॅनेलचे 12, धनश्री सरदेसाई पॅनेलचे 12 तर अपक्ष एक उमेदवार ठरले…

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

     जांबोटी कृषी पत्तीनसाठी आज 25 उमेदवार रिंगणात राहीले आहेत, मा. आ. तथा जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक अरविंद पाटील यांच्या गटातून 12 जण, माजी अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांच्या गटातून 12 तर अपक्ष उमेदवार एक निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत. अरविंद पाटील पॅनल सामान्य पुरुष – जांबोटी राजवाड्यातून राजकुमार अमृत देसाई , जयवंत देसाई ( वडगांव) , जांबोटीपेठमधून मंजुनाथ डांगे, ओलमणीतून जोतिबा नावलकर, ॲड. दिनकर राऊत, मागास (एसटी)- प्रकाश कांबळे आणि राजू तळवार, सामान्य महिला  –  सर्वीशीला देसाई (जांबोटी), प्रभावती देसाई (वडगाव), अ -वर्ग शिवाजी गुरव (चापोली), ब-वर्ग  महादेव पाटील (कापोली) असे यांना अरविंद पाटील पॅनमधून उमेदवारी मिळाली आहे.

     

प्रचार जोरात; चापगावची पुनरावृत्ती होण्याचे चिन्ह….

      अरविंद पाटील यांच्या पॅनेलच्या उमेदवारांनी आपला जोरदार प्रचार सुरू केला असून, मतदार शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेण्याचे कार्य त्यांनी सुरू केले आहे. दोन महिन्यापूर्वी अती चुरशीने झालेल्या चापगाव कृषी पत्तीननवर अरविंद पाटील यांच्या पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. त्याच पद्धतीने, योजनेनुसार प्रचार सुरू केला असून, त्याचीच पुनरावृत्ती जांबोटीही होण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. विरोधकांच्या सत्ताकाळात केलेल्या चुका पटवून देण्याची चतुराई या पॅनेलकडून प्रचार सुरू आहे.

परवाचा सोसायटी कार्यालय लॉकचा मुद्दा गाजण्याची दाट शक्यता...?

     अचानक जांबोटी कृषी पत्तीन कार्यालयाला कोणी लॉक लावल्याने तालुक्यातच हा विषय चर्चेत राहिला होता. कोणी कशासाठी आणि का? सोसायटी बंद केली. सरकारी कार्यालय पूर्वकल्पना न देताच बंद करता येते काय? कायद्यानुसार तर लॉक लावता येत नाही. असे असताना कोणी हे शासकीय शिस्तभंग केले. याचे कारण अद्याप गुपीतच आहे, दुसऱ्या दिवशी प्रशासकांनी येऊन तो टाळा खोलला… पण तरीही टाळा का? याचे स्पष्टीकरण प्रशासकांनीही दिले नाही. त्यामुळे हा मुद्दा अरविंद पाटील पॅनलकडून उचलला जाऊ शकतो.

प्रतिक्रिया 

  बदल घडवण्यासाठी आम्ही रिंगणात आहोत, शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी, तसेच नवीन नवीन योजना आखण्याची आमचा मानस आहे. तालुक्यात डीसीसी बँक संचालक अरविंद पाटील यांनी शेतकऱ्यांचे आतापर्यंत हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच दृष्टीनं आमचीही वाटचाल असेल.

    – राजकुमार अमृत देसाई, जांबोटीवाडा उमेदवार अरविंद पाटील पॅनेल.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *