‘त्या’ कंपनीलाच ‘दाखवला’ बाहेरचा रस्ता!


गणेबैल टोल प्रकरण; राष्ट्रीय महामार्ग मंडळ, एसी आणि काँग्रेस नेते प्रसाद पाटील व कर्मचाऱ्यांची बैठक पडली पार…

बेळगांव/ खानापूर : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

         गेल्या आठवड्यापासून मनमानी करत स्थानिक कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या गणेबैल टोल कंपनीलाच शासनाकडून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश आले असेच म्हणावे लागेल, पुन्हा नवीन निविदा (टेंडर) काढून दुसऱ्या कंपनीकडे टोलचा ताबा देण्याचा निर्णय आज एसी ऑफिसमध्ये पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. एसी श्रवण नाईक, राष्ट्रीय महामार्ग मंडळाचे अभियंते भुवनेश्वर कुमार, तालुका युवा काँग्रेस नेते प्रसाद पाटील, कर्मचारी व त्यांचे वकील बैठकीला उपस्थित होते.

त्या कंपनीला वॉर्मिग देऊनही दमदाटी सुरूच होती; त्यामुळे सदर कंपनीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला….

     राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाच्या अभियंत्यांनी सदर हुळे नामक कंपनीला वॉर्मिग दिली होती, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना पुन्हा कामावर घ्या अशी सूचना राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ अभियंते भुवनेश्वर कुमार यांनी केली होती. पण, तरीही त्यांच्याकडून दमदाटी सुरूच होती. अखेर आज एसी ऑफिसमध्ये त्या कंपनीलाच बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुन्हा टेंडर काढून दुसऱ्या कंपनीकडे टोलचा ताबा सोपविण्यात येईल, शिवाय अन्याय झालेल्या त्या कर्मचाऱ्यांनाही  त्यांची मागणी मान्य करून करत कामावर घेण्यात येईल असेही आजच्या बैठकीत सुचित करण्यात आले.

तालुका काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला…

      सुरवातीपासूनच तालुका काँग्रेसने अन्याय झालेल्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला होता, शिवाय वेळोवेळी पाठपुरावा केल्यानेच शासनाला माघार घ्यावी लागली आहे. मात्र, भाजप आणि समिती नेत्यांनी याकडे पाठ का? फिरवली असाच प्रश्न उपस्थित होत आहे. या आंदोलनामुळे तब्बल 5 दिवस वाहनधारकांना विना टोल प्रवास करण्याची मुभा मिळाली. जोपर्यंत नवीन निविदा प्रक्रिया केली जात नाही तोपर्यंत टोल ऑटो मूडमध्ये राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे…

        


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *