बेळगावकरांच्या पुढाकाराने गोरगरीब जनता सावकारशाहीतून मुक्त झाली:मुख्याध्यापक महेश सडेकर…


सामाज सेवेचा वारसा कायमच ठेवणार: संस्थापक -चेअरमन विलास बेळगावकर, जांबोटी सोसायटीचा 33 वा वर्धापनदिन व दिनदर्शिका प्रकाशन अशा दुहेरी कार्यक्रमांचे आयोजन…

जांबोटी: विलास कवठणकर (लोकहित न्यूज)

       साधारण 1988 ते 90 च्या काळात जांबोटी भागासह तालुक्यातील गोरगरीब जनता सावकारशाहीच्या कचाट्यात अडकून पडली होती, सावकारशाही अर्थात सावकारांकडून घेतललेली कर्जे फेडता फेडता काही पिढ्या संपून गेल्या होत्या. परिणामी घेतलेले कर्ज आणि त्याचे व्याजही तेवढेच अशी भयानक परिस्थिती त्या काळातील समाजाची होती. सावकारशाहीचा फास म्हणजे जणू जीवनाचा शेवटच अशी वेळ तत्कालीन नागरिकांची होती, अशा परिस्थितीत सामान्य कुटुंबातील एक तरुण उठतो आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सोसायटी काढण्यासाठी पुढे येतो, त्याला कितपत सहकार्य मिळेल याची तमा न बाळगता अती कठीण परिस्थितीत आपला उद्देश सफल करत गोर गरीब शेतकऱ्यांना सावकाशाहीतून मुक्त करण्याचे व्रत घेतो. ही काहीं सामान्य गोष्ट नाही, हाच उद्देश सफल करत खऱ्या अर्थाने जांबोटी सोसायटी काढून संस्थापक चेअरमन विलास बेळगावकर यांनी भागातील गोर गरीब जनतेला सावकाशहीतून मुक्त केल्याचे मत जांबोटी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी मांडले.

     गुरुवारी जांबोटीत जांबोटी सोसायटीच्या मुख्य कार्यालयात सोसायटीचा 33 वा वर्धापनदिन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महेश सडेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक -चेअरमन विलास बेळगावकर होते. सोसायटीचे जेष्ठ संचालक अण्णासाहेब कुडतरकर यांनी स्वागत केले. व्यासपिठावर उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, जेष्ठ संचालक पांडुरंग नाईक, संचालक भैरू पाटील, खाचप्पा काजूनेकर, भाऊ कुर्लेकर , मनोहर डांगे, उपस्थित होते.

समाजसेवेचा वसा कायमच राहील: संस्थापक- चेअरमन विलास बेळगावकर ...

       सोसायटीने आर्थिक सहाय्यतेबरोबर शैक्षिणक, होतकरूंना मदत धार्मिक कार्यात आर्थिक सहाय्य अशी समाजाभिमुख सामाज सेवेचा वारसा कायम ठेवणार असे, सांगतानाच सोसायटी किती कठीण काळातून, किती खडतर परिश्रमातून उभारली याची माहिती बोलतांना संस्थापक चेअरमन विलास बेळगावकर यांनी यावेळी दिली. पुढे बोलतांना ते म्हणाले की, सुरवातीला परमिशनसाठी तीन लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले होते, तत्कालीन काही ज्येष्ठ मंडळींच्या सहकार्याने हे काम पुढे नेत , दोनशे, शंभर प्रमाणे शेअर्स जमा करून बऱ्यापैकी रक्कम जमा केली. पण, तरीही टार्गेट पूर्ण होवू शकले नाही. अखेर अथक प्रयत्नांमुळे यात यश मिळाले. आणि त्याचीच आज फलश्रुती मिळते आहे, त्यामुळेच जांबोटी आणि बेळगावकर  या दोन्हीं नावांनी सोसायटीची ओळख निर्माण झाली असून,  ही सोसायटी म्हणजे तालुक्यातच नव्हें तर जिल्ह्यात ब्रँड झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, युवा संचालक भैरू पाटील, अनंत सावंत, सदस्य महमदअली डंबलकर, माजी संचालक पुंडलिक ल. पाटील, वार्ताहर हणमंत जगताप, विलास कवठणकर यांनी आपले विचार मांडले. यावेळी सचिव संतोष गुरव, दिपक गावकर, रामा गावकर विश्वनाथ घाडी यांच्यासह सोसायटीचे सभासद, हितचिंतक व सर्व कर्मचारी उपस्थित होते. सेक्रेटरी दिलीप हन्नुरकर यांनी सूत्रसंचालन केले तर युवा संचालक यशवंत पाटील यांनी आभार मानले.

यश प्राप्त केलेल्या विद्यार्थांचा विशेष सत्कार…

        यावेळी सैनिक अग्निवीर मध्ये भरती झालेल्या विनायक शांताराम सदावर आणि सीए परीक्षेत उत्तम यश मिळविल्याबद्दल प्रेरणा राजाराम कुडतरकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. असेच यश भागांतील विद्यार्थांनी मिळवत रहावे, त्यांना आमचा कायम पाठिंबा असेल असे यावेळी संचालक भैरू पाटील यांनी जाहीर केले…

अध्यक्षीय भाषण करतांना जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक-चेअरमन  विलास बेळगावकर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *