
श्री पांडुरंग सप्ताहाला 31 वर्षांची परंपर; आज देवतांच्या प्रतिमांचे पूजन पार पडले, उद्या धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद, रात्री भजनी भारुड ….
देवाचीहट्टी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
कैवल्याचा चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि घोटगाळी येथील प्रसिद्ध ह.भ.प शांताराम कुंभार यांच्या अधिष्ठान व मार्गदर्शनाखाली देवाचीहट्टीत (ता. खानापूर) आजपासून रविवार दि.15 ते 16 असे दिड दिवसाच्या श्री श्री ज्ञानेश्वरी पारायण पांडुरंग सप्ताह सोहळ्याला सुरुवात झाली असून, सकाळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, हरिभक्त महाराजांच्या हस्ते विविध देवतांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले, 9 ते 12 ज्ञानेश्वरी वाचन , 12 ते 3 सामूहिक भजन , रात्री 9 ते 12 हंडीभडंगनाथ ह. भ. प. सागरनाथ महाराजांचे निरूपण कीर्तन होईल. सोमवारी सकाळी काकड आरती, 8 ते 10 गावात दिंडी प्रदक्षिणा, दुपारी महाप्रसादाने धार्मिक कार्यक्रमांची सांगता होणार असून , रात्री कारलगा (ता. खानापूर) येथील भजनी भारुड होईल. तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.






Leave a Reply