देवाचीहट्टीत धावले 12 हत्तींचे बळ; शेतकऱ्यांची पळापळ; काय करणार वनखाते उपायबळ?


रताळी पोत्यांचे प्रचंड नुकसान ; शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर कायद्याचे बळ कमी आणि शेकऱ्यांकडून नुकसान होईल तर मात्र, वनखात्याचा कायदा जोरात…

विशेष प्रतिनिधी: विलास कवठणकर

      आधीच खानापूर तालुक्यात काहीच राम उरला नसल्याच्या चर्चा जोरात सुरु असतानाच आता जंगली प्राण्याच्या हाहाकारणे शेतकरी वर्ग पुरता हतबल झाला आहे. निलावडे भागात ठाण मांडलेल्या तीन हत्तींचा बंदोबस्त करतांना वनखात्याची पुरती फाटली असतानाच आता देवाचीहट्टीत( ता. खानापूर) भागात तब्बल 12 हत्तींचा कळप पसरला असून, येथील वसंत बाबू धुरी यांच्या शेतातील 35हून अधिक रताळी पोत्यांचे हत्तींकडून नुकसान झाली आहे. आज रात्री ही घटना घडली आहे. परिणामी अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही काय करावे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे वनखाते याबाबत काय करणार? असा सवाल सामान्य शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.

कशी घडली ही घटना.. कोणी पाहिले…

       देवाचीहट्टी येथील रहिवाशी गुरुवारी  विनोद वसंत धुरी हा गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास गावच्या वरच्या बाजूला असलेल्या शेतात भरून ठेवलेल्या रताळी पोत्यांची पाहणी करण्यासाठी गेला असता, साधारण वीस फुटाच्या अंतरावर साधारण 12 हत्तींचा कळप त्याच्या नजरेस पडला. तो पोहचण्याआधीच 35 पोत्यांचे नुकसान हत्तींकडून झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले असून, वनखात्याने तात्काळ पाहणी करावी नुकसान प्रमाणे भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली जात आहे. लगतच असलेल्या संजय नारायण धुरी यांच्याही रताळी पोत्यांचे हत्तींनी नुकसान केले आहे.

अशाप्रकारे रताळी पोत्यांचे हत्तींनी नुकसान केले आहे..

कुठून आला हा एवढा मोठा कळप?

      तब्बल 12 हत्तींचा कळप कोठून आला हे कळेनासे झाले आहे. रात्रीची वेळ असल्याने त्यांचा माग समजू शकला नाही. उद्या याबद्दल सविस्तर माहिती कळेल. बैलुरच्या दिशेने की, कुसमळीकडून आला हेही उद्याच समजू शकेल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वनखात्याला याबाबत कळविले असून, शुक्रवारी त्यांच्याकडून या घटनेचे पंचनामा होणार आहे. शेतकऱ्यांमध्ये आता भितीचे वातावरण पसरले असून, वेळीच वनखात्याने हत्तींचा बंदोबस्त न केल्यास आणखी नुकसान होण्याची भीती आहे…

     


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *