मोबाईल नाव्याच्या रक्षासाला दूर ठेवा: प्राचार्या पूजा पाटकर


जांबोटी  पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत बालदिन हळदी -कुंकूसह खेळांची मेजवानी; विद्यार्थी पालक रमले खेळात…

विलास कवठणकर: जांबोटी लोकहित न्यूज

        गेल्या सहा वर्षापूर्वी म्हणजेच 2019 ते 20- 21 दरम्यान कोरोना व्हायरस जोरात पसरला होता, त्यामुळे स्वतःच्या माणसांना स्वतःची माणसे भेटणे कठीण होवून बसले होते. त्यानंतर जगाला जीवन किती अनमोल आहे हे संपूर्ण जगाला कळले आणि त्यानंतर अनेक बदल घडले. त्याच वेळी मोबाईल नावाच्या भल्या मोठ्या राक्षसाचा जन्म शैक्षणिक क्षेत्रातून झाला अन् मुलांच्या नुकसानीला त्याचवेळी खऱ्या अर्थाने सुरवात झाली. कोरोनामुळे बाहेर पडणे कठीण बनल्याने शालेय अभ्यासाच्या निमित्ताने मुलांच्या हाती मोबाईल लागला. त्यामुळे आपसूकच मुलांना मोबाईलचे वेड लागले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परिणामी लहान मुलांसाठी मोबाईल हा घातकच आहे, शिवाय डोळे, डोके, मेंदूसह अनेक शरीराच्या अवयवांसाठी हानिकारकच असून, त्या राक्षसाला वेळीच बाजुला नाही सारले तर फार मोठी नुकसान होऊ शकते, अशी आव्हानात्मक सूचना जांबोटी बाबुराव ठाकूर कॉलेजच्या प्राचार्या पूजा पाटकर यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या उपस्थितीत पालकांना केली .  त्या जांबोटी केंद्र पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बालदिन, हळदी- कुंकू  कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी कमिटीचे अध्यक्ष महेश जांबोटकर होते. मुख्याध्यापिका व्ही. पी. घाडी स्वागत केले. यावेळी प्रमूख वक्त्या म्हणून गायत्री मिलींद डांगे यांनी उपस्थित होत्या. व्यासपीठावर उपाध्यक्ष संतोष कुर्लेकर, सदस्य दर्शन नाईक, विनायक कोटीभास्कर, रवींद्र शिंदे, पत्रकार विलास कवठणकर, माजी ग्रा. पं. अध्यक्षा राजश्री परमेकर, संध्या कणगुटकर, वर्षा कवटंणकर, दिव्या दिपक नेवगेरे यांच्यासह सर्व पालक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. यावेळी गायत्री मिलींद डांगे, रवींद्र शिंदे, विलास कवठणकर, अतिथी शिक्षकांची भाषणे झाली.

हळदी -कुंकू कार्यक्रम..

हळदी कुंकू उपक्रमाचे महिलांतून कौतुक....

       शाळा सुधारणा कमिटी आणि शिक्षकांच्यावतीने बालदिनाबरोबर महिलांसाठी हळदी-कुंकू या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे महिलांना एकत्र येण्याची संधी मिळाली. यावेळी शाळेच्यावतीने महिलांना हळदी -कुंकू लावून भेटवस्तू देण्यात आली. त्यामुळे महिला भारावून गेल्या. यावेळी लोककल्प फौडेशनच्यावतीने मुलांना शालेय वस्तू भेट देण्यात आल्या.

       


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *