माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांच्या आजच्या वाढदिनी खानापुरात आज विशेष कार्यक्रम…
लोकहित न्यूज: विलास कवठणकर (वाढदिवस विशेष वृत्त)
तत्कालीन म. ए समितीच्या प्रभावात खानापुरात राष्ट्रीय पक्ष वाढवणे म्हणजे तारेवरची कसरत होती. अशावेळी उमदा भाजप कार्यकर्ता म्हणून श्री संजय कुबल यांनी खेडोपाड्यात घरोघरी जाऊन भाजप पक्षाची माहिती दिली. शिवाय राष्ट्रीय पक्षामुळे भविष्यात काय बदल होणार हेही पटवून दिल्यानंतर तालुकावासियांनी भाजपला स्वीकारले. त्यानंतर माजी आ. कै. प्रल्हाद रेमानी यांची पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षाचा तोही कडतर परिस्थितीतून पुढे आलेल्या भाजप पक्षाचा पहिला आमदार तालुक्याने पाहिला. त्या बदल्यात माजी आ. रेमाणी यांनी खानापूर तालुक्यासाठी दिलेले योगदान कोणीही विसरणार नाही असा विकास करुन दाखवला. यामध्ये माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांचे लाभलेले मोठे योगदानसर्वांच्याच स्मरणात आहे. कै. प्रल्हाद रेमाणी आणि सद्याचे विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर या दोन पक्षाच्या आमदारांच्या विजयात विशेष योगदान लाभलेले खंदे नेतृत्व, प्रमुख वक्ते म्हणून ओळख असणाऱ्या श्री. संजय कुबल यांचा आज विविध ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे, यात विशेष म्हणजे पक्षातर्फे खानापुर येथील विश्रामगृहात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त श्री.कुबल यांना ‘लोकहित न्यूज’ तर्फे खूप खूप साऱ्या शुभेच्छा..
सामान्य कार्यकर्ता ते तालुका अध्यक्ष, प्रमुख वक्ता…
सामान्य कार्यकर्ता ते तालुका अध्यक्ष तोही राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष होणे तितके सोपे नाही. त्याला खडतर परिश्रम, पक्षनिष्ठा आणि पक्षासाठी कायम झोकून घ्यावे लागते. तरच इथपर्यंत मजल मारता येवू शकते. हे सर्व गुण श्री. संजयजी कुबल यांच्यात ठासून भरले होते, आणि त्यामुळेच ते तालुक्यापासून ते दिल्लीपर्यंत परिचित आहेत. त्यांना सामजिक, राजकिय आणि सहकार क्षेत्राबाबत उत्तम अभ्यास असल्यामुळे ते पक्षाचे धधगती तोफ अर्थात प्रमुख वक्ते म्हणूनही जिल्ह्यात परिचित आहेत.
सामान्य जनतेचा आवाज….
तालुक्यात कोणाचीही सत्ता असुदे, तालुक्यांतील नागरिकांना मदत आणि त्यांच्या समस्या कशा सोडवाव्यात हे माजी भाजप अध्यक्ष संजय कुबल यांच्याकडून शिकावे. कोणीही सामान्य नागरिक त्यांच्याकडे समस्या घेवून गेल्यास ते तालुका जिल्हा ते राज्यस्तरीय कोणतेही काम वा समस्येची तात्काळ पूर्तता करतात, यात त्यांचा चांगलाच हातकंडा आहे. त्यामुळे ते सामन्यांसाठी संजय भाऊ म्हणूनही सर्वांच्या ओळखीचे आहेत…
चौकट –
बांधकाम खात्याच्या (pwd ib) विश्रामगृहात पक्षातर्फे आज वाढदिवस विशेष कार्यक्रम…
आपल्या लाडक्या नेत्याला विशेष शुभेच्छा देण्यासाठी तालुका भाजप पक्षातर्फे खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (pwd ib)विश्रामगृहात आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे पक्षाचे सचिव गुंडू तोपिनकट्टी यांनी सोसियल मीडियाद्वारे कळविले आहे. यानिमित्त आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी आ. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्यासह सर्व नेते, पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी वेळेवर यावे असे कळविण्यात आले आहे..






Leave a Reply