जांबोटी माध्यमिक विद्यालयाकडून माजी विद्यार्थी  ‘अग्नी शूरवीरांना’ मनाचा मुजरा!


जांबोटी माध्यमिक विद्यालयात विशेष सत्कार , पुढच्या वाटचालीस दिल्या शुभेच्छा!

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

       विश्वभारत सेवा समिती संचलित जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची सैनिक सेवेच्या ‘अग्नीवीर’ मध्ये भारती झाली आहे, त्याबद्द्ल त्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी जांबोटी माध्यमिक विद्यालयात या शूरवीरांच्या विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या विद्यालयाच्या एकूण 10 विद्यार्थ्यांची सैनिक सेवेच्या अग्नीवीर मध्ये भरती झाली आहे. त्यापैकी ओंकार सुनिल चिगुळकर, पवन शांताराम गुरव, सुरज अनिल जांभेकर, दत्तात्रय अर्जुन देसाई, मोनेश्री भरणकर, ओंकार चांगाप्पा देसाई, हनुमंत हंनबर या यशस्वी वीरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या ईशास्तवनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदीहळी यांनी होते. मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी स्वागत करतांना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. व आपल्या माजी विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

      यावेळी पुण्याचे उद्योजक सुनीत जोशी व साक्षी जोशी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, नेरसा शाळेचे मुख्याध्यापक विनोद देसाई व त्यांच्या पत्नी अनुराधा देसाई यांच्याहस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. स्वरा जोशी, महेश साबळे, सुनिल ठाणब, संपदा तीरवीर, अर्जुन गावडे उपस्थित होते. सहशिक्षक तुकाराम सडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर सुजाता चलवेटकर यांनी आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *