मोरबमधील ‘त्या’ 164 एक्कर जमिनीसाठी अधिकाऱ्यांची लाखोंची ‘डील ‘ ? नागरिकात रंगली चर्चा


वनखात्याकडे जमीन जाते असे सांगून, देणाऱ्यांची मर्जी नसतानाही जबरदस्तीने जमिनी खरेदीचा गडगंज लोकांचा फंडा..

        

        –मोरब 164 जमीन ‘ चा’घोटाळा भाग -2

खानापूर :  लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

                राकसस्कोप धरणात  बेळवट्टी ( ता. बेळगांव) गावच्या शेतकऱ्यांच्या गेलेल्या जमिनीच्या बदल्यात सरकारने त्यांना खानापूर तालुका हद्दीतील अर्थात दोन्हीं तालुक्यांच्या सीमेलगतच असलेली सर्वे नंबर – 21 आणि 22 सरकारी पड जमिनीतील 164 एक्कर जमिन ‘बक्षीस पत्र ‘ म्हणून दिली आहे.  माञ, त्यातील काहींनी जमीन कवडीमोल भावाने विकली असून , शिल्लक असलेली जमिनही अनेक भीतीदायक कारणे सांगून लाटण्याचा प्रयत्न चालला आहे, अशी माहिती  सूत्रांकडून मिळत आहे, यात किती तथ्य आहे हे ? तपासानंतर कळेलच! हा सर्व खटाटोप करण्यासाठी इस्टेट एजंट टोळी आणि खानापूर – जांबोटीतील काहीं ‘लॉगिंन’ धारक अधिकाऱ्यांमध्ये ‘ लाखोंची डील ‘ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.  त्यामध्ये कोण कोण अधिकारी गुंतले आहेत, कुणाकुणाचे हात रंगीले झाले आहेत, याचा आढावा लोकहित न्यूज तर्फे घेण्यात येत आहे. आणखी काहीं माहिती हाती लागली तर ती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल!

 

बक्षीस पत्र म्हणजे ‘अपापाचा माल गप्पापाला ‘?

       धरणात जमिनी गेलेल्यांना सरकारने त्या बदल्यात बक्षीस पत्र म्हणून जमिनी दिल्या आहेत, मात्र, त्या जमिनी विक्री का केल्या जात आहेत, याचे कारण, शोधले असता, इस्टेट एजंट टोळी आणि खानापूर जांबोटीतील तहसील अधिकाऱ्यांची जबरदस्ती अधिक असल्याचे बोलले जात आहे.  तुमच्या जमिनी वनखात्यात जाणार, तुम्हीं कशाला जमिनी ठेवलाय टाका विकून अशी भीती आणि अजब सल्ला खुद्द अधिकाऱ्यांकडूनच दिला जात आहे. त्यामुळे जमीनदार गोंधळून गेले आहेत. आणि त्यातूनच बिजगर्णी भागातील एका नेत्याने या जमिनीतील काहीं जमीन खरेदीही केल्याचे ऐकिवात आहे. पण, काहीं कारणामुळे ‘तो नेताच’ सध्या अडचणीत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

….बेळगांवमधील तो गडगंज व्यक्ती कोण? ..

       मोरबमधील ती जमीन काहीं अधिकाऱ्यांना हाताशी धरून गिळायला बसलेला तो बेळगांवचा गडगंज व्यक्ती कोण? आणि त्याला कोणाचा राजकीय वरदहस्त लाभलेला आहे, असाच प्रश्न सर्वांना पडलेला आहे. गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्तीने लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा लोकांना म्हणावे तरी काय? माफिया.. अशाच प्रतिक्रिया अनेक क्षेत्रातून येत आहेत.

..आज त्यातील काही जमीनदार शेतकरी तक्रार देण्यासाठी खानापुरात आले होते म्हणे; जांबोटी क्रॉसवर त्यांना कोणी का? अडविले?

        आम्हीं आमच्या जमिनी विकणार नाहीं, कोणी याबाबत हलचाली चालविल्या आहेत, त्यांच्या विरोधात सरकारकडे तक्रार करण्यासाठी त्यातील काही जमीनदार शेतकरी आज खानापुरात आले असता, कोणत्या अधिकाऱ्याने त्यांना अडवून जांबोटी क्रॉसवरूनच परत धाडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यात काहीं तरी गोलमाल असून, लखोंची डील लपवली जातेय का? असा संशय बळावला आहे.  यावेळी समजूत काढून सदर जमीनदारांना परत पाठवण्याचे कारण काय? याबाबत तर्क वितर्क काढले जात आहेत. यामध्ये जांबोटी ‘तहसील’मधील काहीं अधिकारी गुंतले असून, त्यांना खानापुरातून एका बैठ्या अधिकाऱ्याचा वरदहस्त लाभला असून, त्याचे वजन थेट बंगळूरपर्यंत असल्याचे बोलले जात आहे. या विषयावरून तहसीलदारही गोंधळून गेले असून, तहसील कार्यालयात एकच खळबळ मजल्याचे चित्र आहे.

   

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *