तिसऱ्यांदा संजू सॅमसन ठरला विजयाचा शिलेदार; बुमराहचे मॅच विनिंग विकेट….
अहमदाबाद: लोकहित न्यूज (विलास कवठणकर!क्रीडा)
गेल्या महिनाभर भारतात सुरू असलेल्या टी 20 वर्डकप स्पर्धेचा आज समारोप झाला असून, गतवर्षी विजेता ठरलेल्या भारताने यंदाही बाजी मारली आहे. त्यामुळेच यंदाही भारतच टी 20 वर्डकपचा चॅम्पियन ठरला आहे. आज अहमदाबादमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना भारताने 255 धावांचे टार्गेट ठेवले होते. या सामन्यातही सलामीवीर संजू सॅमसनने 89 धावांचे योगदान दिले तर अभिषेक शर्मा 52, ईशान किशन 54 धावांची आतषबाजी केली. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडची पूर्ण टीम 159 धावांमध्ये ऑलआऊट झाली. बुमराह 4, अक्षर पटेल 3, अभिषेक शर्मा 1, वरून चक्रवर्तीने 1 विकेट घेतला. सुरवातीला वाटत होते की, न्यूझीलंड हा सामना जिंकेल पण, पहिला विकेट त्यानंतर लागोपाठ विकेट गेल्याने एकतर्फी हा सामना भारताच्या बाजूने झुकला. संजू सॅमसन ठरला मॅन ऑफ मॅनचा शिलेदार, आजच्या सामन्याचा हिरो ठरला जसप्रीत बुमराह…. लोकहित न्यूज तर्फे टीम इंडियाचे अभिनंदन…
तिसऱ्यांदा भारताने टी 20 वर्डकपवर नाव कोरले…
2007 मध्ये महेंद्रसिंग धोनी, 2024 मध्ये रोहित शर्मा आणि आज सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारताने टी 20 वर्डकपवर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे भारताने इतिहास रचला आहे…






Leave a Reply