संजय कुबल ‘जिल्ह्यात’; कार्यकर्ते ‘उत्साहात’!


जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष म्हणून कुबल यांची ‘वर्णी’; तालुक्यात पक्ष बळकटीचे मिळते आहे ‘फळ’….

      

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) (राजकीय )

         कार्यकर्ते, विभाग प्रमुख, नेते आणि पक्ष नेतृत्व यांची सांगड घालत भाजप आणि आपण एकच अशी ओळख निर्माण केलेल्या माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांची पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, बेळगांव भाजप ग्रामीणचे उपाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नुकतेच राज्याध्यक्ष बी. विजेंद्र यांच्या आदेशानुसार जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुभाष पाटील यांनी नियुक्तीचे पत्र देवून संजय कुबल यांचा सन्मान केला अन् तालुक्यातील कार्यकर्त्यात एकच उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. आजवरची पक्षनिष्ठा, पक्ष बळकट करण्याबरोबर कार्यकर्त्यांची मोट बांधत खेडोपाड्यात पक्ष पोहचवण्यात कुबल यांचा सिंहाचा वाटा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असा छाप त्यांनी तालुक्यात सोडला आहे. लोकहित न्यूज तर्फे संजयजी कुबल यांचे खूप खूप अभिनंदन….. उपाध्यक्ष नेमणुकीचे नियुक्ती पत्र देतांना जिल्हा भाजप अध्यक्ष सुभाष पाटील, बाजूला माजी आमदार संजय पाटील, राज्य कोअर कमिटी सदस्य म्हणून म्हणून ज्यांची मागच्याच महिन्यात निवड झाली ते प्रमोद कोचेरी, युवा नेते पंडित ओगले आदी मान्यवर उपस्थित होते..

  

कार्यकर्ता अन् नेता कसा असावा याचे उदाहरण म्हणजे, संजय कुबल..

      ज्याकाळी म. ए समितीच्यासमोर कोणाचा आवाज चालत नसे, अशावेळी एकट्यांचीच राष्ट्रीय पक्ष डरकाळी फोडणारी एकमेव तोफ म्हणून संजय कुबल यांना ओळखले जाते. त्याकाळची जनता ही समितीच्याच पाठीशी उभी असल्याने अशा परिस्थितीत राष्ट्रीय पक्ष वाढवणे म्हणजे मोठे आव्हान होते. सीमाप्रश्न प्रत्येकाच्या मनात असल्याने समिती सोडून दुसऱ्याला साथ देणे त्यात राज्यस्तरावरून येथील मराठी जनतेला त्रास देणाऱ्या राष्ट्रीय पक्षांना तर अजिबात थारा नव्हता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशा परिस्थितीत संजय कुबल यांनी अगदी नियोजनबद्ध कार्यकर्त्यांची फळी तयार करून पक्ष वाढवला कालांतराने त्यांना नवनवीन पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्ते व नेत्यांची साथ लाभली आणि त्यामुळेच आज तालुक्यात नंबर एकचा पक्ष म्हणून भाजप पक्षाने ओळख निर्माण केली आहे, त्यामध्ये कुबल यांचे प्रयत्न मोठे आहेत…. त्यामुळेच कार्यकर्ता आणि नेता कसा असावा याचे उदाहरण म्हणून संजय कुबल यांचे देता येईल…

प्रतिक्रिया –

पक्षाने माझ्या कामाची दखल घेऊन याआधी तालुका अध्यक्ष आणि आता जिल्हा उपाध्यक्ष म्हणून टाकलेली जबाबदारी हे माझे परमकर्तव्य आहे असे मी समजतो. पक्ष हेच माझे कुटुंब म्हणून यापुढेही जोमाने पक्षासाठी कार्यरत राहीन, तालुका जिल्हा आणि राज्यातील पक्ष नेतृत्वाचे खूप खूप आभार…

संजय कुबल, नूतन जिल्हा भाजप उपाध्यक्ष…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *