तर,..मग जनतेच्या समस्या कशा सुटणार? वर आणि या आमदारांचे बोट सरकारकडे; 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन…
बेळगांव: विलास कवठणकर (लोकहित न्यूज)
राज्य सरकारच्या पंचहमी योजनांमुळे इतर बाबतीत विकास रखडला आहे, सरकारकडे निधीच नाही अशी ओरड बहुतेक आमदारांकडून ऐकू येते. मात्र, खुद्द विधान केले सभापती बसवराज होरट्टी यांनी बोलतांना सांगितले की, उत्तर कर्नाटकातील आमदार आपल्या भागातील मुद्दे आणि समस्या मांडतच नाहीत. त्यामुळे विकास कसा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. होरट्टी हे बेळगांव दौऱ्यावर आले असून, 8 डिसेंबर पासून बेळगावात सुरू होणाऱ्या हिवाळी आधिवेशनाची तयारी आणि आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष यु टी. खादर, जिल्हाधिकारी महमद रोशन, जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद आदी आधिकारी उपस्थित होते.
यावेळी दोन्हीं सभांच्या अध्यक्षांनी सुवर्णसौध पाहणी केली, 8 डिसेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत बेळगावात राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन चालणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्व आधिकारी उपस्थित होते.
खुंटलेल्या विकासावरून वादंग होण्याची शक्यता….
मागचे दोन महिने ऊस दरावरून राज्य गाजले, अखेर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 3 हजार तीनशे रूपये दर मान्य केल्यानंतर ही आंदोलने शांत झाल्याचे दिसत आहे. मात्र, पंचहमी योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त अर्थिक भार पडला आहे. त्यामुळे रस्ते, पाणी आणि बहुतेक योजनांसाठी मिळणारा निधी वेळेत मिळत नाही, शिवाय पंचायत, बांधकाम खात्याच्या तिजोरीत खडखडाट ऐकू येत आहे. परिणामी मतदार संघातील जनतेचा ‘आक्रोश’ आमदारांच्या नावाने घुमत आहे. त्यामुळे सरकारकडे बोट दाखवणारे आमदार अधिवेशनात छड्डू ठोकणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.






Leave a Reply