राज्य सरकारकडून ऊसाला 3300 रुपये दर जाहीर..


आजच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय; शेतकऱ्यांना तुर्तास दिलासा…

बंगळूर :  विलास कवठणकर) लोकहित न्यूज..

     गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांकडून राज्यभर ऊस दर वाढीसाठी आंदोलने,निवेदने सुरू आहेत, अलीकडच्या दोन महिन्यात तर आंदोलनांचा सपाटाच सुरू आहे. महाराष्ट्र प्रमाणे 3500 रूपये दर द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती.  अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेवून राज्य सरकारने आजच्या मंत्रीमंडळ आणि आमदारांच्या बैठकीत 3300 रूपये दर जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे. तरीही काही कारखाने लिखित आदेश मागण्याचे तुणतुणे वाजवीत असल्याची चर्चा शेतकऱ्यांत रंगली आहे, असे असेल तर सरकारने याचाही विचार केला पाहिजेत अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आज बंगळूरात पार पडली बैठक…

      वाढत्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता सरकारकडून मागच्या आठवड्यात एक बैठक बोलावून यावर तोडगा काढण्याची हमी देण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आज बंगळूररात्त मंत्री मंडळ आणि आमदारांची बैठक पार पडली. यावेळी शेतकरी स्थानिक आमदार आणि अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेवून 3300 रुपये दर ठरवण्यात आला. असा आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व साखर कारखाने आणि आधिकाऱ्याना बजावला आहे. त्यानुसार सरकारतर्फे याबाबत नियमावली ठरवण्यात आली असून, हे नियम सर्व कारखान्यांसाठी बंधनकारक असतील. त्यात महत्वाचा नियम म्हणजे सरकारने जाहीर केलेले दर द्यावेच लागणार आहे. यात कोणी बनवाबनवी केली तर त्यांच्यावर कायदेशीर बडगा उगारण्यात येईल असेही सरकारने बजावले आहे.

आमदार विठ्ठल हलगेकर यांचाही बैठकीत सहभाग…

  खानापुरचे आमदार विठ्ठल हलगेकर हेही बंगळूरातील बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी खानापूरची समस्या मांडली. त्यामुळे यावेळी त्यांचेही म्हणणे सरकारकडून ऐकून घेण्यात आले.

प्रतिक्रिया

      बोले तैसा चाले त्याची वृंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे खानापूरच्या माजी आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेस सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनीही या समस्येची गंभीर दखल घेवून, याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे दर वाढीची जोरदार मागणी लावून धरली होती. त्यामूळेच आजचा निर्णय लागला आहे. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन!

  – दिपक कवठणकर, तालुका काँग्रेस युवा नेते..

..शेतकऱ्यांना तुर्तास तरी दिलासा मिळाला….

      आम्हीं ठीक ठिकाणी ऊस दर वाढीसाठी आंदोलने छेडली होती. शुक्रवारपर्यंत आमची रस्ता रोको आंदोल ने सुरुच होती. आज अखेर 3300 रूपये दर सरकारने जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे. हा आदेश आल्यानंतर काहीं कारखाने लिखित आदेश पाहीजे तरच आम्हीं याबाबत विचार करू अशी त्यांची कुजबुज सुरु झाली आहे. यावरही सरकारने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे..

   – किशोर मीठारी, राज्य अखिल भारतीय कृषक संघाचे राज्य उपाध्यक्ष..

     

     

        


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *