कामगारांसह सर्वजण अचंबित; उद्या प्रशासक आल्यानंतर खोलणार लॉक…
जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
आधीच नवीन रणांगण सुरू झाले असतांना मध्येच नवीन विषय काय हा? असाच प्रश्न सर्वांना नाही पडला तर नवलच! जांबोटी कृषी पत्तीन कार्यालयाला कोणी अज्ञातांनी लॉक घातले असून, त्याचे कारण कोणालाच कळेनासे झाले आहे. सध्या या सोसायटीचा ताबा शासकीय प्रशासकांकडे आहे. येत्या 22 तारखेच्या दरम्यान या सोसायटीची निवडणूक होणार आहे. असे असतांना मध्येच काय हा प्रकार कोणालाच कळेनासे झाले आहे. याची माहिती प्रशासक हंजी यांना देण्यात आली असून, उद्या ते आल्यानंतर त्याची चौकशी होईल शिवाय पोलिस तक्रार करूनच सदर टाळा खोलला जाईल अशी माहिती सूत्रांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली…
अधिक माहिती काय? पोलिसांचीही पाहणी…
सकाळी नेहमीच्या वेळात जांबोटी कृषी पत्तीनचे कर्मचारी कार्यालयात गेले असता, त्यांनी लावलेला टाळा सोडून दुसरा एक कुलूप कोणी लावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अन् त्यानंतर लागलीच ही बातमी वाऱ्यासारखी फिरली. कोणी लावले लॉक… कोणी लावले लॉक अशी एकमेकाशी नागरिकांची विचारणा सुरू झाली. कोणाची तक्रार नाही, कोणाचा इशारा नाहीं तर मग काय हा प्रकार??? अशीच चर्चा जांबोटी भागात सुरू आहे…
प्रतिक्रिया
मी जेंव्हा आमच्या वेळेत कार्यालयात गेलो तेंव्हा आम्हीं घातलेला टाळा सोडून दुसरा एक कुलूप लावल्याचे आमच्या नजरेस पडले. त्याची तत्काळ प्रशासकांना माहिती दिली. उद्या प्रशासकाच्या परवानगीने सदर टाळा खोलला जाईल..
–खंडोबा राऊत, सचिव जांबोटी कृषी पत्तीन..
आम्हाला माहिती मिळताच, घटनास्थळी जावून पाहणी केली. शिवाय आजुबाजूच्या नागरिकांना, कर्मचाऱ्यांना विचारणा केली. याबद्दल कोणाकडून काहीच माहिती मिळाली नाही..
–बाहुबली मारग्यानकोप्प, जांबोटी पोलिस एसआय…






Leave a Reply