
तालुक्यात दोन हजार 500 युवकांना उद्योग रोजगार निर्मितीच्या माध्यमातून मिळणार नोकऱ्या; गर्लगुंजी ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील यांची राज्य वाणिज्य आणि उद्योग संचालकांसी भेट….
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
नेहमीच स्वतःचे गाव, भाग आणि तालुक्यासाठी धडपड करत राहणाऱ्या गर्लगुंजी ग्राम पंचायतीचे सदस्य तसेच काँग्रेस युवा नेते प्रसार पाटील यांनी उद्योग आणि वाणिज्य खात्याच्या माध्यमातून तालुक्यातील 2500 तरुणांना नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार त्यांची धडपड सुरू असून, नुकतेच प्रसाद पाटील यांनी राज्य उद्योग व वाणिज्य खात्याचे सहसचिव सत्यनारायण भट यांची भेट घेऊन खानापूर तालुक्यात उद्योग निर्मितीच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना नोकऱ्या देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यावर श्री. भट यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत, उद्देश चांगला असल्याचेही प्रसाद पाटील यांना प्रत्युत्तर दिले. लवकरच या दृष्टीने राज्यसरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती प्रसाद पाटील लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.
तालुक्यात वीट, वाळू आणि पारंपरिक शेती व्यवसायाव्यतिरिक्त दुसरा उद्योग नाहीच;: त्यामुळे तालुक्यातील युवकांना परराज्यात जावे लागते….
राज्यात खानापूर तालुक्याची व्याप्ती मोठी असली तरी पारंपरिक व्यवसाय सोडून दुसरा कोणताच व्यावसायिक मार्ग नाही. वीट, वाळू आणि शेती या रोजच्या व्यवसायातून म्हणावे तितके उत्पन्न मिळत नसल्याने येथील युवकांना घरदार सोडून परराज्यात जावे लागले. त्यामुळे तालुक्यातच विविध उद्योग सुरू केल्यास युवकांचे भविष्य उज्वल होईल, असाच उद्देश उराशी बाळगून सामाजिक भान असणारे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांनी तालुक्यात उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यात ते नक्कीच यशस्वी होतील अशी तालुक्यातील नागरिकांची अपेक्षा आहे.. परवाच्या वाणिज्य खात्याच्या सहसंचालकांच्या भेटीवेळी उद्योगपती सुरेश पाटील व कल्लाप्पा लोहार यांनीही उपस्थित होते.
प्रतिक्रिया –
तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देण्यासंदर्भात माझे प्रयत्न सुरू असून, त्याचा शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. वाणिज्य खात्याच्या सहसंचालकांच्या भेटीदरम्यान यावर सविस्तर चर्चा झाली असून, लवकरच तालुक्यात जागेची पाहणी करून याची सुरुवात करण्यात येईल, त्यासाठी लागणारा पाठपुरावा आम्हीं सतत करत राहू…
–प्रसाद पाटील, ग्राम पंचायत सदस्य गर्लगुंजी .






Leave a Reply