जांबोटी माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवाजी शिंदे ‘सर ‘बेपत्ता…


दहा दिवसांपासून थांगपत्ता नाही; पोलिसांकडून माहिती देण्याचे आवाहन..

     जांबोटी: लोकहित न्यूज

          जांबोटी माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवाजी गंगाराम शिंदे (वय 73, राहणार शिवाजी नग्र खानापूर) हे 5 ऑक्टोंबर पासून बेपत्ता आहेत, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. कोणच्या नजरेस पडल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. यासाठी 08336- 222333 या पोलीस स्थानकातील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.  अलीकडच्या काळात ते मानसिक अस्वस्थ होते, त्यामुळेच ते कुठे तरी चुकले असावेत अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

   

शिंदे सरांचे जांबोटी भागासाठी मोठे योगदान ….

          ज्याकाळात जांबोटी पश्चिम भागातील अपंग ( दिव्यांग) नागरिकांना कोणताच आधार नव्हता तेंव्हा शिंदे सरांनी 1985 साली जांबोटी – बैलुर -कणकुंबी पश्चिम भाग अपंग ( दिव्यांग) संघांची स्थापना करून त्यांच्या जगण्याला बळ दिले. भागांतील सर्व अपंग नागरिकांना एकत्र करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करत खासगी व्यक्तींकडूनही अपंगांच्या उदरनिर्वाहासाठी विविध वस्तू मिळवून दिल्या. तर संघाच्या माध्यमातून भागातील बहुतेक अपंगाना शिंदे यांनीच सरकारी पगार (पेन्शन) मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. अलीकडे जांबोटी स्थानकावरील जांबोटी गोवा रस्त्याला लागून असलेल्या दत्ता पेट्रोल पंपासमोरील जागेत प्लॉट खरेदी करत त्यामध्ये अपंगांसाठी वसतिगृह व विविध व्यवसायिक दृष्टीकोनातून इमारत उभी करण्याची योजना आखली आहे. त्यानुसार  सदर जागेत कॉलम भरणीही झाली असून, काही कारणास्तव हे काम थांबले आहे. त्यालाही गती मिळो आणि निराधार अपंगांचे स्वप्न साकार होवू दे अशीच अपेक्षा अपंग नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *