अमेरिका, इस्राईलने इराणवर केलेल्या हल्यात  85 जण ठार, 45 जण गंभीर जखमी…


जागतिक घडामोडी वृत्त….

इराणने क्षेपणास्त्र कार्यक्रम आवरता घ्यावा यासाठी अमेरिका इस्राईलचा दबाव, समृध्दीकरणाची पातळी अणुऊर्जा कार्यक्रमापुरता इराण तयार झाला होता… मात्र, तोवर अमेरिका इस्राईलचे जोरदार हल्ले ; इराणचेही प्रत्युत्तर…

   

दुबई (अमिराती): लोकहित न्यूज नेटवर्क (विलास कवठणकर)

       इराणने युद्धनीती वाढवू नये , अमेरिका आणि इस्राईलच्या दबावाखाली कायम राहावे अशी मागणी अमेरिका आणि इस्राईलची होती. मात्र, ती इराणने धुडकावून लावल्याने संतप्त झालेल्या अमेरिका इस्राईलने इराणवर जोरदार हल्ले चढवले, त्यात इराण प्रांतातील होरमोझगन येथील शाळेवर झालेल्या हल्यात शाळकरी विद्यार्थ्यांसह आजुबाजूच्या 85 जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून, तर इराणच्याच मिनाब या शहर परिसरातील 45 जण गंभीर जखमी अवस्थेत सापडले आहेत. तर दुसरीकडे इराणनेही इस्रायलच्या तेल अविव, आयफा, रामल्ला, कुवेत, कतार, बहरीन बेटांवर तर अमेरिकेच्या युएईतील बेटांवर प्रत्युत्तरदाखल हल्ले चढवले आहेत.    

       परिणामी इतर देशांतून इराणकडे जाणारी विमान वाहतूक स्थगित करण्यात आली असून, याचा तेल वाहतुकीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून अमेरिका इस्राईल व इराणला शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. या युद्धाची जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे..

इराणवर केंव्हा आणि कुठे झाला पहिला हल्ला….

         शनिवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 9.30 मिनिटांनी अमेरिका आणि इस्राईलने  इराणचे सर्वोच्च धर्माचे नेते आयातुल्ला अली अमेनी यांच्या कार्यालयाजवळ पहिला हल्ला केला, असे इराणकडील प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या टीव्ही दृश्यात दिसून येत आहे. मात्र, आयातुल्ला हे त्यावेळी उपस्थित होते की नाही हे समजू शकले नाही. मागच्या वर्षी जून महिन्याच्या दरम्यान झालेल्या 12 दिवसांच्या युद्धापेक्षाही भयंकर हे युद्ध असल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले. आता कोण माघार घेतो अन् कोणकोणते सौदे होतात हे येत्या दोन दिवसात दिसून येईल. तर दुसरीकडे सौदी अरेबियानेही इराणने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे..

प्रतिक्रिया

    इराण राजवटीकडून असलेला धोका नष्ट करून अमेरीका जनतेला संरक्षण देणे आमचे कर्तव्य आहे, आमची कारवाई पूर्ण झाली की, इराण जनतेने सरकारचा ताबा घ्यावा, आमच्या निमित्ताने चालून आलेली इराण जनतेला ही एक संधी आहे…

डोनाल्ड ट्रम्प, अमेरिका अध्यक्ष…

इराणकडे शस्त्रास्त्र असता कामा नये, त्याचा संपूर्ण मानव जातीला धोका निर्माण होऊ शकतो. आम्हीं केलेल्या हल्ल्यांमुळे इराणी जनतेला दिलासा मिळणार आहे…

      –बिन्यामित नेतान्याहू , पंतप्रधान इस्रायल…

  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *