विमान प्रवासात दिल्लीला जाणारी परदेशी युवती पडली होती बेशुद्ध; अशावेळी आपला वैद्यकीय अनुभव वापरत डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी दिले युवतीला जीवदान …
गोवा: लोकहित न्यूज ..
कोणतेही शिक्षण वा कला ही वाया जात नाही, याचा प्रत्यक्ष अनुभव एआयसीसी सचिव तथा माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांच्या विमानातील सामाजिक कार्यातून आला आहे . मुळात पेशाने डॉक्टर असलेल्या निंबाळकर यांनी गोव्याहून दिल्लीला चालल्या होत्या, त्याच विमानातून मुळता कॅलिफोर्निया येथील आणि दिल्लीची सून असलेली जीना ही युवतीही त्याच विमानातून प्रवास करत होती. परिणामी अचानक जीना हिला चक्कर येवून ती बेशुद्ध पडली, याचा आवाज कानी पडताच एमडी डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी तात्काळ आपली वैद्यकीय कला पणाला लावून कोणतेही डॉक्टरी साधन अथवा औषध जवळ नसतांना तीला शुध्दीवर आणत जणू यम सदनातून तीचे प्राण काढून आणले. या त्यांच्या धाडसी सामाजिक कार्याबद्दल देशभरातून कौतुक होत आहे, नुकतीच या सामाजिक कार्याची खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही दखल घेत डॉ अंजली निंबाळकर यांचे कोडकौतुक केले आहे. अशा या सामाजिक कार्याला ‘लोकहित न्यूजतर्फे सलाम ‘
घडलेल्या या घटनेविषयी सांगताहेत खुद्द डॉ. निंबाळकर ….
गोवा ते दिल्ली हा जवळपास अडीच तासांचा प्रवास होतो, त्यामुळे नुकतेच कुठे तरी मला झोपेची पेंग येते ना येते तेच माझ्या पाठीमागून हेल्प हेल्प असा आवाज ऐकू येत. क्षणिकही विलंब न करता मी जावून पाहते तर एक परदेशी युवती बेशुद्ध पडली होती आणि तिचे अंग अगदी थंड झाले होते. अशावेळी काय करावे हे सुचेनासे झाले होते, अखेर कार्डियो पल्मोनरी रीसटीशन च्या पद्धतीने उपचार केला. त्यांनतर थोड्याच वेळात शुध्दीवर आणले पण, ती पुन्हा बेशुद्ध पडली अन् तेव्हा मात्र, काहीच कळेनासे झाले होते, त्यांनतर पुन्हा अर्धा तास तिच्यावर उपचार करत संपुर्ण प्रवास संपेपर्यंत तीच्या सोबतच उभे राहून देखरेख केली. विमानातूनच दिल्लीला अँब्युलन्सला बोलावून घेतले आणि विमनातून उतरताच त्या 34 वर्षीय युवतीला ॲम्ब्युलन्समधून दवाखान्यात दाखल केले. जीना हिचे सासरचे नातेवाईक दिल्लीमध्ये राहतात आणि तिच्या सासूचे नावही डॉ अंजली असेच आहे अशी माहिती डॉ अंजली निंबाळकर यांनी लोकहित न्यूज शी बोलताना दिली.







Leave a Reply