पोलिसांची माहिती; त्यामुळे आता अनेक प्रकरणांची उकल होणार…
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) क्राईम
कालमनी, हब्बनहट्टी तीर्थक्षेत्रावर आणि बैलुरमध्ये चोरी करणारे चोरटे पोलिसांनी टाकलेल्या टॅपिंगच्या सहाय्याने चापगाव ( ता. खानापूर) येथे सापडण्याचे वृत्त आताच लोकहित न्यूज च्या हाती लागले आहे. त्यामध्ये कितपत तथ्य आहे, हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. त्यामुळे खानापूर शहर जांबोटीसह ग्रामीण भागात आतापर्यंत झालेल्या अनेक चोरी प्रकरणांचा छडा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चोरी झाल्यापासून पोलिसांनी फोन ट्रॅपिंगवर टाकले होते….
कालमनी हब्बनहट्टी तीर्थक्षेत्र आणि बैलूर येथे चोरी झाल्यानंतर पोलिसांनी कॉल ट्रॅकिंगवर टाकले होते. यात बैलूर चोरी प्रकरणात सापडलेल्या संशयिताच्या सहाय्याने ही कारवाई यशस्वी मार्गाने जाण्याची शक्यता आहे. त्याच यश आल्यास अनेक गोरगरीब नागरिकांना सहकार्य लाभेल. त्या अनुषंगाने पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणांचा छडा लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे…





Leave a Reply