बैलूरमध्ये मोठी चोरी करतांना तीनपैकी एक चोराला पकडण्यात गावकऱ्यांना यश; चोरटे स्थानिक तरुण असल्याचा दाट संशय..
जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर ) क्राईम
कालमणीनंतर बैलूर आणि बैलूर नंतर श्री स्वयंभू मारूती हब्बनहट्टी तीर्थक्षेत्रावर देणगी पेटीतील रक्कम चोरी, एकाच आठवड्यात तीन चोऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे तिन्हीं चोऱ्यांमधील चोरटे एकच असून,जवळचेच आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बैलूरमध्ये थोडेसे गावाबाहेर असणाऱ्या नामदेव कणकुंबकर यांच्या घरातील सात तोळे सोने व 70 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी करतांना तिघांपैकी एकाला पकडण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. पण, यात गांभीर्याची बाब म्हणजे सापडलेला तो एक जण खानापूर तालुक्यातील शिरोली गावचा आहे. यावरून प्रश्न असा पाडतो की, या तिन्हीं चोऱ्या एकाच टोळीने केल्या असून, त्यामध्ये स्थानिकांचा सहभाग असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्या चिदंबर सुतार नामक संशयिताकडून माहिती मिळेलच. पण, तालुक्यातील स्थानिक युवक वा नागरिक यामध्ये सहभागी असतील तर ही गांभीर्याची बाब ठरू शकते.
बंद घरेच लक्ष्य; गावात काहीं वस्तू विक्रीसाठी येणाऱ्यांवर अधिक संशय…
ज्या घरात कोणीच राहत नाहीत अशा घरांचा हाक हवाला घेऊन अशीच घरे अधिक प्रमाणात चोरट्यांकडून लक्ष्य केली जात आहेत. परवा परवा कालमणी येथील सुनील चिगुळकर यांच्या घरी कोणी राहत नसल्याचे पाहूनच चोरी करण्यात आली. तर बैलूरमधील नामदेव कणकुंबकर यांनीही आपल्या गावाबाहेरील घराला कुलूप लावून दूध काढण्यासाठी गोठ्यात गेले असता, त्याचवेळी चोरटे घरात घुसले . पण, सुदैवाने त्यांची पत्नी पानी आणण्यासाठी घरी गेली असता, आपल्या घराचे कुलूप तोडून कोणी तरी आत शिरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखून याची तत्काळ गावकऱ्यांना माहिती दिली. लागलीच गावकरी तात्काळ घटनास्थळी धावले. चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला पण, त्यावेळी दोघे चोरटे पळून गेले अन् एकटा सापडला. त्याच्या ओळखपत्रावरून तो शिरोली (ता. खानापूर) येथील असल्याचे समजले, त्याची पोलिस चौकशी केल्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा होईल.
पोलिसात गुन्हा नोंद, ‘संशयित ‘तरुणच ‘..
तिघा संशयितांविरोधात पोलिसात आजच गुन्हा नोंद झाला असून, लवकरच एफएसआयएरही दाखल होणार आहे. सध्या सापडलेला संशयित (25 वय) आतीलच असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. श्वान पथकालाही प्रचारण करण्यात आले होते, त्यांच्याकडूनही तपासाचा अहवाल लवकरच सादर केला जाईल, त्यानंतर म्हणजेच आठवडाभरात या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
बेकारीमुळे की चैनीसाठी ‘तरुण’ गुन्हेगारीत?…
बैलूर चोरी प्रकरणात हाती लागलेला संशयित 25 वयाच्या आतीलच असल्याचे धक्कादायक वृत्त समोर येत आहे. त्यामुळे हे तरुण कामधंदा नसल्यामुळे बेकरीमुळे की, चैनीसाठी तरुणवर्ग चोरी गुन्हेगारीत अडकले आहेत काय? अशा धक्कादायक बाब चिंतनाचा विषय बनली आहे. सध्या सापडलेला संशयित तरुण स्थानिक तालुक्यातील असून, त्याचे साथीदारही जवळचेच असल्याचा दाट संशय वर्तविण्यात येत आहे..
प्रतिक्रिया
एक संशयित सापडल्याने या प्रकरणांचा तपास करण्यास मदत मिळेल. त्यामुळे लवकरच पळून गेलेल्या संशयितांना जेरबंद करण्यात येईल. शिवाय कालमणी आणि स्वयंभू मारूती हब्बनहट्टीतील तपासही वेगाने लावण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.






Leave a Reply