गावाच्या देवस्की, सार्वजनिक कामात अडवणारे ‘खाणार तीन वर्षे ‘झेल’ची हवा ‘ यासाठी नवीन सरकारी कायदा….


समाजकल्याण मंत्री डॉ.महादेवप्पा यांच्याकडुन विधेयक सादर; गावच्या सार्वजनिक ठिकाणीं  ‘मीपणा ‘ करणारे जाणार तीन वर्षे झेलमध्ये आणि वसूल होणार लाख रुपये दंड ..

बेळगांव लोकहित न्यूज: ( विलास कवठणकर) विशेष बातमी…

        विशेषकरून ग्रामीण भागात आम्हीच देवस्कीचे ‘मालक ‘ म्हणणाऱ्या गावामध्ये ‘देवस्कीच्या जोरावर मीपणा’ करणाऱ्यांना सरकारने दणका दिला आहे. यापुढे कोणत्याही व्यक्ती वा जाती समुहाला देवस्की कामात अथवा सार्वजनिक जागेमध्ये वेगळल्यास, तशा तक्रारीनुसार सरळ झेल डांबण्यात येणार असून, वर एक लाख रूपये दंडही वसूल करण्यात येणार आहे, असे सरकारी विधेयक ( कायदा) बेळगावमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये समाजकल्याण मंत्री महादेप्पा यांनी सादर केले आहे. त्यामुळे दादागिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या निर्णयाचे सर्वच भागातून त्यात विशेषकरून ग्रामीण भागांतून स्वागत आणि सरकारचे अभिनंदन केले जात आहे.

या कायद्यामुळे देवस्कीच्या जोरावर ‘दादागिरीला’ करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसणार आहे…

          खानापूर तालुक्यात देवाचीहट्टी,दारोळी, चीगुळे गावामध्ये असे प्रकार घडले आहेत, यापुढे असे प्रकार न थांबल्यास या नविन कायद्याने बळ मिळेल. यासाठी ज्यांच्यावर याबाबतीत अन्याय होत असेल तर अशा नागरिकांनी नवीन कायद्याचा आधार घेण्यास कोणतीच हरकत नाही, त्यानुसार तक्रार करता येते. शिवाय त्याची पोलीस, तहसिलदार यांनी तत्काळ दखल गुन्हा नोंद करून घेणे बंधनकारक असेल असेही या कायद्यात नमूद करण्यात आले आहे.

..कसा आहे हा कायदा आणि त्यानुसार काय शिक्षा होणार…

     गावात धार्मिक अर्थात देवस्की ठिकाणी अडवणे, प्रार्थना स्थळांवर , धार्मिक विधी करण्यास रोखणे अर्थात विधी करण्यास नकार देणे, मुलांना एकत्र खेळण्यास रोखणे, लिंगाच्या अर्थात शरीरावर भेदभाव करणे, सामजिक धार्मिक, मानवी हक्कांना नकार देणे आधी बाबतीत बहिष्कार टाकणे नवीन कायद्याने गुन्हा आहे, असे यावेळी समाजकल्याण मंत्र्यांनी जाहीर केले. असा प्रकार कुठे झाल्यास सबंधित अन्याय झालेल्या व्यक्तीच्या तक्रारीनुसार तीन वर्षे झेलची हवा खावी लागेल शिवाय 1 लाख सरकारी दंडही भरावा लागणार आहे, अशी ही शिक्षा असेल!

सभाध्यक्ष यू. टी. खादर यांनी अवाजी मतदानाने विधेयक मांडल्याचे केले जाहीर….

समाजकल्याण मंत्री डॉ. महादेवप्पा यांनी गुरुवारी बेळगावातील अधिवेशनमध्ये हे विधेयक मांडले, त्यावर सभाध्यक्ष यू. टी. खादर यांनी अवाजी मतदानाने विधेयक मांडल्याचे जाहीर केले.

मदत करणाऱ्यांनाही दणका बसणार आहे…

     देवस्की वा गावच्या सामाजिक कामात अडवणूक करणाऱ्यांना सल्ला अथवा मदत करणाऱ्यांनाही शिक्षा होणार आहे. एखादी व्यक्ती किंवा व्यक्तीच्या समूहावर सामाजिक बहिष्कार टाकणे चुकीचे असून, कायद्याने गुन्हा आहे. शिवाय बहिष्काराची जात पंचायत अर्थात याबाबत गावात मीटिंग घेणेही कायद्याने चुकीचे ठरेल. असे प्रकार घडणल्यास तीन वर्षे झेलात खडी फोडावी लागेल शिवाय 1 लाख सरकारी दंडही वसूल करण्यात येईल. न्यायालय आणि पीडितांच्या अर्थात अन्याय झालेल्या नागरीकांच्या संमतीने हा वाद मिटवता येतो. पण, त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावीच लागेल.

     


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *