विरोधीकडील काहीं लोकांची धडपड जोरात सुरू; त्यातील एक महिला माझ्याकडे आली होती: आ. हलगेकर….
लोकहित न्यूज: खानापूर विलास कवठणकर
माझ्या पीए मला विश्वासात न घेता स्वतःसाठी कमिशनची मागणी केल्याचा ऑडिओ तालुका भर फिरत आहे,शिवाय त्यावरून मला बदनाम करायचे षडयंत्र काहीं विरोधी लोकांनी सुरू केले आहे. पण, माझा एकच प्रश्न आहे, तो म्हणजे एमएसएल (MSL) दारू बारसाठी माझ्या नावाचा कोण वापर करतय? याचीही आम्हीं चौकशी करणार आहे. त्यातील एक महिला माझ्याकडे आली होती पण, काय करणार त्यांच्यातच चढाओढ सुरू आहे. ही लोकं चक्क एक्साईज अबकारी अधिकाऱ्यांपर्यंत माझ्या नावाची शिफारस करत आहेत,असेही आ. विठ्ठल हलगेकर यांनी लोकहित न्यूज शी दूरध्वनीवरून बोलतांना सांगितले.
काहीं जण माझ्या नावाचा वापर बेंगळूरलाही करतात…
एकीकडे माझा विरोध करणे आणि दूसरीकडे माझ्या नावाचा वापर बेंगळूरलाही करत असल्याचे सांगत, ते लोक माजी आमदारांचेच असल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे, याचाही यापुढे विचार करण्यात येईल असेही आमदार विठ्ठल हलगेकर यांनी पुढे बोलतांना म्हणाले. थोड्याच दिवसात त्यांनी या सर्व गोष्टींचा जाहीर खुलासा करण्यात येणार असल्याचेही संकेत दिले आहेत…






Leave a Reply