संजय कुबल हे तालुका भाजपचे केंद्रस्थान : खा. हेगडे -कागेरी…


माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांच्यावर जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव, आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती..

खानापूर : लोकहित न्यूज

     माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांच्यामुळेच भारतीय जनता पार्टीचे नाव तालुक्यातील जनमनात रुजले आहे, या पक्षात कितीही वादविवाद असले तरी सर्वांचे केंद्रस्थान श्री. कुबल यांच्याकडे पाहिले जाते असे मत कारवारचे खासदार तथा माजी शिक्षणमंत्री विश्वेश्वर हेगडे -कागेरी यांनी मांडले. खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात मोठ्या जल्लोषात पार पडलेल्या संजयजी कुबल यांच्या वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर तालुक्याचे लोकप्रिय आ. विठ्ठल हलगेकर, जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका भाजप अध्यक्ष बसवराज सानीकोप, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष पंडित ओगले, माजी सभापती सयाजी देसाई, प्रधान सचिव मल्लाप्पा मारीहाळ व गुंडू तोपिनकट्टी, लक्ष्मण झांजरे, युवा नेते दौलतराव कोलीकर, पवन गायकवाड, कृष्णा भरणकर , मंगेश मुळीक, ॲड. चेतन मनेरीकर, गजानन पाटील, प्रकाश निलजकर , महादेव गावकर यांच्यासह सर्व मान्यवर, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,हितचिंतक उपस्थित होते.

पुढे, बोलतांना खा. हेगडे म्हणाले, केंद्र असो वा राज्यस्तरीय पक्षाच्या बैठकीत खानापूर भाजपचा विषय येताच माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांचे नाव हमकास घेतले जाते, कारण, त्यांनी पक्षासाठी दिलेले योगदान कोणीही विसरणार नाहीत हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजेत. कुबल हेच तालुका भाजपचे आधार असल्याचेही ते म्हणाले.

संजय कुबल हे आमच्यासाठी आदर्शच: आ. विठ्ठल हलगेकर...

    संजय कुबल यांनी पक्ष बांधणीसाठी घेतलेल्या अथक प्रयत्नांमुळे कै. प्रल्हाद रेमाणी नंतर मीही आमदार होवू शकलो, कुबल यांचे परिश्रम आज फलदायी ठरत आहेत. त्यांनीच तालुक्यात कार्यकर्त्यांनी इतकी मोठी मोट बांधली , ते आमचेही आदर्श असल्याचे आमदार विठ्ठल सो. हलगेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *