माझ्या पीएला कामावरुन कमी करा; आ. हलगेकर यांचे विधानसभा सचिवांना पत्र…


चुकीच्या पद्धतीने काम केल्याचा ठपका; शिरोली प्रकरण भोवले…

बेळगांव::लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

      चुकीच्या पद्धतीने काम केल्याचा ठपका ठेवत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपले पीए गुरुराज चरकी यांना कामावरुन तत्काळ कमी करा, अशा आशयाचे पत्र राज्य विधानसभा सचिवांना दिले आहे. दोन दिवसांपूर्वी शिरोली ग्राम पंचायतीच्या 20 लाखाच्या फंडातील 25 टक्के कमिशनचा ऑडिओ तालुकाभर जोरदार वायरल झाला होता. तर विरोधी तालुका काँग्रेस नेत्यांकडून राज्य गृहमंत्र्यांना भेटून ऑडिओ प्रकरणाची तक्रार करण्याचा इशारा दिला होता. शिवाय ऑनलाईन सोसियल मीडिया व वेबपोर्टलमध्ये बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. शिवाय आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या विरोधात विरोधकांकडून टीकेची झोड उडत आहे. तसेही आ. हलगेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना पीएची चूक सापडल्यास कामावरुन कमी करण्यास मागे पुढे पाहणार नाही असा इशारा दिला होता. त्यानुसार हे पत्र सरकारला आ. विठ्ठल हलगेकर यांनी धाडले आहे. सदर पीए हे पंचायत राज्य विभागासाठी होते. पीएला कामावरुन कमी केल्यानंतरही शिरोली ऑडिओ प्रकरणावरून राजकारण गाजणार की, थंड होणार हे काही दिवसांतच स्पष्ट होईल…

    

प्रतिक्रिया…

   आम्हीं आधीच जाहीर केले आहे , की पंचायतीत कधीही हस्तक्षेप करणार नाही. तसा पीएनाहीं आदेश दिला होता, त्यांनी तो पाळला नाही, म्हणूनच त्यांना बडतर्फ करण्याचे पत्र सरकारला पाठवले आहे.

आमदार विठ्ठल हलगेकर .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *