जांबोटीत ‘जांबोटी क्रिकेट लीग’चे थाटात उद्घघाटन: आजच्या दुसऱ्या दिवशी पाच सामने पडले पार…
जांबोटी: विलास कवठणकर ( लोकहित न्यूज क्रीडा प्रतिनिधी)
राज्यातच आमदारकीच्या निवडणुकीत अधिक मताधिक्य मिळवण्याचा मान मिळवणारे , खानापुरचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर यांनी जांबोटीच्या क्रिकेट मैदानावर जोरदार फटकेबाजी मारतांना दिसले! निमित्त होते ‘जांबोटी क्रिकेट लीग’ च्या दुसऱ्या पर्वाच्या उद्घघाटनाचे! आयोजकांनी आ. हलगेकर यांना मैदानात बोलवताच त्यांनी पहिल्यांदा बॅटची मागणी करत जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे भागात एकच चर्चा रंगल्याचे दिसून आले. यावेळी बोलतांना आ. विठ्ठल हलगेकर यांनी क्रिकेट मैदानासाठी 5 एक्कर जागा मिळवून देण्याची घोषणा केली. शिवाय, तालुक्यात आणि जांबोटी भागात होवू घातलेल्या विकास कामांबाबत भाष्य केले. यावेळी उपस्थित असलेल्या माजी आ. अरविंद पाटील यांनीही संधी न दवडता राजकारणाप्रमाणे बॅटने बाँड्री जवळ केली. यावेळी अमंत्रित सर्व पाहुणे उपस्थित होते. सूत्रसंचालन लीग’चे सदस्य अनंत आणि यांनी केले तर लीग’चे अध्यक्ष सचिन साबळे यांनी आभार मानण्यात.
आजच्या दिवशी (रविवार दि.16) पाच सामन्यांची रंगत झाली तर उद्या ( सोमावर -17) च्या सामन्यांमध्ये अधिकच येणार रंगत…
शनिवारी उद्घघाटन झालेल्या जांबोटी क्रिकेट लीग च्या दुसऱ्या पर्वाच्या आजच्या (रविवार दि.16) दुसऱ्या दिवशी लॉटस प्रमाणे पाच अतितटीचे सामने खेळवण्यात आले. तर उद्या सोमवार दिनांक 17 रोजी अधिकच रंगतदार सामने पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना उपलब्ध होणार आहे. आठवडाभर ही स्पर्धा चालणार असून, विजेत्यांना अनुक्रमे 1 लाख 1हजार, 55 हजार 555, शिवाय वैयक्तिक बक्षीसेही देण्यात येतील. विशेष म्हणजे या स्पर्धेमुळे नवोदित उदयमुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळाल्याच्या प्रतिक्रीया भागातून व्यक्त केल्या जात आहेत..

जांबोटी क्रिकेट लीगकडून खेळाबरोबर सामाजिक कार्यही उल्लेखनीय: भाजप मा. अध्यक्ष संजय कुबल…
तालुका भाजपचे माजी अध्यक्ष संजय कुबल यांनी बोलतांना जांबोटी क्रिकेट लीग ने खेळाबरोबर सामाजिक कार्यही सुरू ठेवल्याबद्दल मी कौतुक करतो. त्यांनी हे कार्य असेच कायम सुरूच ठेवावे अशीही सूचना त्यांनी पुढे बोलतांना केली. यावेळी व्यासपिठावर लीगचे अध्यक्ष सचिन साबळे, उपाध्यक्ष व्यंकट पाटील, खजिनदार दौलत कोलीकर, सदस्य अनंत सावंत, लीगचे मुख्य मार्गदर्शक रमेश कांबळे, लीगचे सदस्य व माजी जांबोटी पंचायत अध्यक्ष महेश गुरव, ‘लोकहित न्यूज’ चे संपादक विलास कवठणकर, लीगचे सदस्य विलास गायकवाड, संजय वा. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.







Leave a Reply