20हजाराची रोख रक्कम, सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास;; ग्रामीण पोलिसांकडून तत्काळ बंदोबस्ताची मागणी…

कालमणी : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
बंद घराचे बाहेरील व आतील दरवाजे तोडून 20 हजार रोख रक्कम व सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास केल्याची घटना मंगळवारी रात्री कालमणीत( ता. खानापूर) घडली. कणकुंबी माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक व जांबोटी भागातील तरुण भारतचे प्रतिनिधी सुनील चिगुळकर यांच्या कालमणी येथील बंद असलेल्या घरात ही चोरीची घटना घडली आहे. सुनील चिगुळकर यांनी मुलांच्या शिक्षणासाठी सध्या पीरणवाडी येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी कालमनी गावातील मराठी उच्च प्राथ. शाळेत स्नेह संमेलन होते, शिवाय बंद घरात कोणी नसल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी घराचे बाहेरील व आतील दरवाजे तोडून घरातील तिजोरीतील साहित्य अस्तव्यस्त टाकून 20 हजाराची रोख रक्कम व सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास केला. चिगुळकर यांनी आपल्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, त्याचे प्रक्षेपण त्यांना मोबाईलवर दिसते. पण, बुधवारी त्यांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज बघण्याचा प्रयत्न केला तेंव्हा काहीच दिसले नाही. त्यामुळे त्यांनी लगेच आपल्या गावातील भाच्याला घरी जाऊन पाहणी करण्यास सांगितले. त्यावेळी या घटनेचा उलगडा झाला.
त्यानंतर लागलीच लगेच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, त्यांच्याकडून जांबोटी हवालदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्वान पथकाच्या सहाय्याने पाहणी केले असता, घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या आमटेकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत श्वान गेले अन् येथून पुढे काहीच समजू शकले नाही. लवकरात लवकर या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावण्याची मागणी भागातील नागरिकांतून होत आहे.






Leave a Reply