आजचा मराठी भाषिकांचा मेळावा बंद पाडण्याचे सरकारचे कारस्थान; तरीही मराठी भाषिकांच्या भावना बुलंद…
खानापूर: लोकहित न्यूज
आजपासून बेळगावात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर म्हणून आजच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांनी महामेळावा घेण्याचा निर्णय नुकताच आहे, त्याला सरकारने तोंडी परवानगीही आहे. पण, आतापर्यंतचा इतिहास पाहता कर्नाटक सरकारला मध्येच पोटशूळ उउटण्यासारख्या घटना नवीन नाहीत. यावेळीही असेच घडले आहे, मेळावा होण्यास काही तास असतानाचा खानापूर म.ए समिती नेत्यांना खानापूर पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली आहे. यामध्ये सकाळीच पोलिसांनी नेत्यांचे घर गाठून त्यांना पोलीस ठाण्यात आणले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मराठीने पछाडलेल्या कर्नाटक सरकारची दडपशाही मराठी भाषिकांवर सुरू झाली असून, या कृतीचा मराठी भाषिकांतून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
कुणाकुणाला झाली अटक….
माजी आमदार दिगंबर पाटील, तालुका समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, युवा नेते निरंजन देसाई, गोपाळराव पाटील, रविंद्र देसाई यांना खानापूर पोलीसांनी अटक केली आहे..
समिती नेत्यांची पोलीस ठाण्यातही जोरदार घोषणाबाजी….
खानापूर समिती नेत्यांना अटक करून पोलीस स्थानकात आणल्यानंतर या ठिकाणीही समिती नेत्यांनी ‘नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी न्ही चेलेगी ‘ अशा घोषणांनी पोलीस स्थानक दणावून सोडले.
आणखी काहीं नेत्यांना अटक होण्याची शक्यता…
महामेळावा होवू नये म्हणून पछाडलेल्या कर्नाटक सरकारकडून म. ए समितीच्या आणखी काहीं नेत्यांना अटक होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामध्ये खानापूर असो किंवा बेळगांव या दोन्हीं ठिकाणी पोलिसांनी अटकसत्र हाती घेतल्याची माहिती मिळत आहे..







Leave a Reply