याआधी जिल्हा भाजप उपाध्यक्ष म्हणून उत्तम प्रकारे धुरा सांभाळत पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील नेते म्हणून कोचेरी यांची ओळख!
बंगळूर/ खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
एखाद्या पक्षाचा पुढारी अर्थात नेता कसा असावा याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणून खानापूर तालुक्याचे क्रियाशील नेते आणि जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांचे देता येईल. अतिशय शांत स्वभाव, अभ्यासू वृत्ती, गल्ली ते दिल्लीपर्यंत जुनी ओळख आणि मुख्य म्हणजे सर्व भाषांचे उत्तम ज्ञान असलेल्या या निष्ठावंत नेत्याची आता राज्य भाजप पक्ष कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांचे समाजाप्रती तळागाळापर्यंत कार्य,आतापर्यंत पक्ष बळकटीबरोबर समाजात सामाजिक नेते म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच त्यांच्यावर राज्याच्या पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवत राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड केली आहे. याबद्दल त्यांच्यावर राज्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लोकहित न्यूज तर्फे प्रमोद कोचेरी यांना खूप खूप शुभेच्छा!
पक्षाची कार्यकारिणी म्हणजे काय? तीचे कार्य आणि अधिकार काय असतात…
कोणत्याही पक्षाची राज्य कार्यकारिणी म्हणजे पक्ष धोरणात्मक निर्णयाची विशिष्ट संस्था आहे. त्यामध्ये पक्ष प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस जिल्हा पक्ष अध्यक्षांचा समावेश असतो, या राज्य कार्यकारिणीचे मुख्य कार्य म्हणजे राज्य पातळीवर निवडणुकीची धोरणे ठरवणे, जनमत घेऊन योग्य उमेदवारीची निवड करणे, संघटनात्मक निवडणुका घेणे, जनआंदोलन उभी करणे, राज्य सरकारच्या विरोधात जनमत तयार करणे होय.
कार्यकारिणीची पक्षासाठी मोलाची आहे… काय आहेत त्यांचे अधिकार…
- राज्यात पक्षाचे जाळे विस्तारणे, नविन सदस्य नोंदणी करणे, जिल्हा व तालुका स्तरावर कमिट्या नेमणूक करणे.
- विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे धोरण ठरवणे, तिकीट अर्थात उमेदवारीसाठी शिफारस करणे.
- पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहचवणे.
- कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे असे कार्य असते.
प्रतिक्रिया
जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांची पक्षासाठी तळमळ, पक्षनिष्ठता मोलाची ठरली आहे. ते नेहमी पक्ष बळकटीसाठी कार्यरत असतात, त्यांची कार्यकारिणीत निवड होणे म्हणजे त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची पोचपावती आहे.
-आमदार विठ्ठल हलगेकर …






Leave a Reply