माजी आ. अरविंद पाटील पुरस्कृत स्पर्धा; 1लाख 1रु पहिले,70 हजार 1 रू द्वितीय बक्षिस, 12 संघांचा समावेश, सामान्यांचे युट्यूबवरून प्रक्षेपण…
ओलमणी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
जांबोटी भागातील आयपीएल स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओलमणी (ता. खानापूर) येथील ओलमणी स्पोर्ट्स क्लबच्यावतीने मा.आ. अरविंद पाटील पुरस्कृत क्रिकेट लीगच्या चौथ्या पर्वाला उद्या ( बुधवार दिनांक 17) पासून दिमखात सुरवात होत आहे. त्यामिमित जिल्ह्यातील आजी -माजी मान्यवरांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
1 लाख रुपये पहिले तर 70 हजार रुपये दुसरे बक्षिस…
या स्पर्धेतील विजेत्यांना 1 लाख रुपये पहिले तर 70 हजार रुपये दुसरे बक्षिस देण्यात येणार आहे, तसेच वैक्तिक बक्षिसेही बहाल करण्यात येतील.
भव्य मैदानावर रंगणार 12 संघात मोठी चुरस; सामन्यांचे युट्यूबवरुन थेट प्रक्षेपण….
जांबोटी भागातच भव्य असे क्रिकेट मैदान ओलमणीत बनवण्यात आले असून, याच मैदानावर 12 संघामध्ये सामने रंगणार आहेत. या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण आपण युट्यूबवरही पाहू शकता. सुरवातीपासून ते सामने संपेपर्यंत युट्यूब सेवा असेल असेही आयोजकांकडून कळविण्यात आले आहे..







Leave a Reply