विराटचेही जलद अर्ध शतक; प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने दिले होते 271 धावांचे आव्हान; भारतीय गोलंदाजी चमकली…
विशाखापत्नम: लोकहित न्यूज (क्रीडा प्रतिनिधी,विलास कवठणकर)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका भारताने 2-1 ने आपल्या नावावर केली आहे. हिटमॅन रोहित शर्माने 25 वी धाव घेवून 20 हजार धावसंख्या पार केली आहे. असा कारनामा करणारा तो चौथा भारतीय ठरला आहे. याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड यांनी असा पराक्रम करून दाखवला आहे. तर शूभमन गीलच्या गैरहजेरीत संधी मिळालेल्या यशस्वी जस्वालने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले दमदार शतक ठोकले आहे. तर रोहितने 75 धावांची खेळी साकारली, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीने आजही चांगलीं खेळी करत जलद अर्ध शतक पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने 271 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते, आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगलीं चमक दाखवली, प्रसिद्ध कृष्णा – 4, कुलदीप यादव -4 बळी घेतले. तर आफ्रिकेकडून क्विंटन डीकॉकने शतकीय खेळी केली ते कर्णधार टेंभू बवूमा याने 48 धावा केल्या. विराट कोहलीने मालिकाविराचा मान पटकावला!






Leave a Reply