सामान्यांच्या समस्या सोडवणारा एकमेव ऑफिसर म्हणून कल्लाप्पा कोलकार यांची ओळख…. लोकहित न्यूज तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली..
खानापूर : लोकहित न्यूज
ऑफिसर कसा असावा याचे उदाहरण समाजासमोर ठेवणारा, तालुक्यांतील कोणीही सामान्य नागरिक तहसीलदार ऑफिसमध्ये कामासाठी गेला की,लगेच काम करुन देणारा, शिवाय लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणारे व्यक्तीमत्व म्हणून ओळख असणाऱ्या खानापूर कार्यालयातील उपतहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांचे मंगळवार ( दिनांक – 30 रोजी) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 50 वर्षाचे होते. त्यांचे मूळ गाव कडोली ( ता. बेळगांव) कोलकार हे अनेक वर्षे खानापूर तहसीलदार ऑफिसध्ये उपतहसीलदार ते शिरस्तेदर म्हणून कार्यरत होते.
….असा प्रामाणिक ऑफिसर पुन्हा होणे नाहीं ..
‘जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला ‘ या म्हणीप्रमाणे कल्लाप्पा कोलकार यांचे जीवन कसे? संपले ! याचा तालुका आणि जिल्ह्यातील नागरिकांना एक धक्काच बसला ! खूप चांगला माणूस शिवाय सामान्य नागरिकांचा ‘आधार ‘ म्हणून त्यांची ओळख होती. कोणतेही काम असुदे कोलकार यांनी स्वतः त्यात लक्ष घालून करून देत. एकीकडे या ना त्या कारणाने कायम चर्चेत राहणाऱ्या खानापुर तहसीलदार कार्यालयात हे व्यक्तीमत्व वेगळेच होते. तालुक्यांतील कोणा एकाही नागरिक वा ऑफिसराची यांच्याबद्दल कधीच कोणती तक्रार नव्हती! असा अधिकारी पुन्हा होणे नाही…
लोकहित न्यूजतर्फे भावपुर्ण श्रद्धांजली! परमेश्वर पवित्र आत्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!






Leave a Reply