पक्ष संघटन कार्य पाहता काँग्रेस पक्षाकडून डॉ. निंबाळकर यांच्यावर अधिक विश्वास; खानापुरकडे थोडे दुर्लक्ष झाले असले तरी, लवकरच हिकडेही सक्रिय होणार…
नवी दिल्ली: लोकहित न्यूज नेटवर्क (विलास कवठणकर)
गोव्यापाठोपाठ केंद्रशासित राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाँडिचेरी राज्याचीही प्रभारी काँग्रेस एआयसीसी सचिव म्हणून वरिष्ठांकडून डॉ. अंजली निंबाळकर यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे निंबाळकर यांच्यावर सध्या 3 केंद्रशासित प्रदेश आणि एक राज्य असा कामाचा ताण असून, याआधी काळात केरळ, उत्तराखंड, उत्तरप्रदेश राज्यांच्या पक्ष बळकटीचीही जबाबदारीही त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्यानेच त्यांच्यावर पक्षाचा विश्वास दृढ झाला आहे. असे असले तरी 3 केंद्रशासित प्रदेश आणि एक राज्याचा कार्यभार पेलणे म्हणजे तितके सोपे नसते. डॉ. निंबाळकर यांच्या अभ्यासू, संयमी कृतीमुळे त्या प्रभावी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया वरिष्ठांकडून दिल्या जात आहेत.
खानापूरसाठीही डॉ. निंबाळकर लवकरच कार्यशील असतील…
मूळच्या खानापूरच्या माजी आमदार असलेल्या डॉ. अंजली निंबाळकर यांच्यामुळे खानापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. शिवाय त्यांचे राज्यस्तरीय पक्षीय कार्यही खूप मोलाचे ठरल्यानेच त्यांच्यावर अखिल भारतीय काँग्रेस सचिव पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येणार. त्यामुळे खानापूर हा त्यांचा गड असून, तो राखण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात. अलिकडच्या काळात त्यांच्यावर पक्षीय जबाबदारी वाढल्याने त्यांचे तालुक्याकडे थोडेसे दुर्लक्ष झाल्याचे त्यांचेच कार्यकर्ते व तालुक्यातील नागरिक बोलत आहेत. त्यामुळे मा.आ.डॉ. निंबाळकर या लवकरच तालुक्याच्या जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीत सक्रिय असतील असे त्यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना कळविले आहे.. तरी कार्यकर्त्यांनी सजग अन् निवडणुकीच्या तयारीत रहावे असेही आवाहन त्यांनी लोकहित न्यूज माध्यमातून केले आहे…






Leave a Reply