जांबोटीत हळदी -कुंकू कार्यक्रमानिमित्त 108 वेळा श्री दुर्गा माता स्तोत्र पठण..


दुर्गा देवीसमोर भजन, पुजा अर्चा धार्मिक कार्यक्रम पार पडले..

जांबोटी:  लोकहित न्यूज

      जांबोटी येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने श्री दुर्गा देवी उत्सवानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता. देवीसमोर भजन पुजा -अर्चा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बेळगांव सनातन संस्थेच्या पदाधिकारी वेदश्री गोरल आणि भाजप नेत्या धनश्री सरदेसाई यांनी धर्म आणि हळदी कुंकू कार्यक्रमाविषयी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आणि दौडचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *