तलाव नसतानाच पडला खर्च: जोतिबा भेंडिगेरी यांचा आरोप..


बेकवाड पंचायतीचे प्रकरण, तालुका पंचायत मॅनेजरांना निवेदन सादर; पीडीओ म्हणतात कायदेशीरच केले काम ..

  

खानापूर: लोकहित न्यूज

     सामाजिक कार्यकर्ते जोतिबा भेंडीगेरी यांनी खानापूर तालुक्यातील बेकवाड ग्राम पंचायत क्षेत्रात तलाव नसतानाच बिल काढल्याचा आरोप करत तालुका पंचायत मॅनेजरांना निवेदन सादर केले आहे. सर्वे क्रमांक- 44 मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे दाखवून अनेकवेळा निधीचा गैरव्यवहार केला असून, प्रत्यक्षात असे कोणतेच काम झाले नसल्याचा आरोप निवेदनात केला आहे. याबाबत अनेक दिवसांपासून मी प्रयत्न करत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही म्हणूनच आज तालुका पंचायतीला निवेदन देत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.

     खाली दाखवल्याप्रमाणे पीडीओंच्या म्हणण्यानुसार 1) क्रमांकाचे छायाचित्र -तलावाचे खोदकाम करताना रोजगार हमी योजनेचे कामगार . 2 क्रमांकचे छायाचित्र तलावाचे काम पूर्ण करून त्यामध्ये भरलेले पाणी दिसत आहे.. याची खातरजमा तपासाअंती होईलच!

सरकारी गायरानमध्ये तलाव आम्हीं खोदला असून, त्याचे सर्व पुरावे आणी परवानगी आमच्याकडे आहे, सरकारी गायरान, वनखाते जमीनीत नवीन तलाव खोदण्याचे प्रोव्हिजन आहे. त्यानुसारच आम्हीं काम केले आहे. याची ‘एडीनां’ही पूर्वकल्पना आहे.

  • नागाप्पा बन्नी, तत्कालीन पीडीओ बेकवाड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *