… एकीकडे ‘नृत्यआनंद’ तर दुसरीकडे ‘जड’ अंतःकरणाने ‘सातवीच्या’ विद्यार्थ्यांना निरोप!


जांबोटी पूर्ण प्राथ.मराठी शाळेचे स्नेह संमेलन ठरले भागातच ‘लय भारी’....

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

        गेली सात वर्षे एकच शाळेचे आंगण,जीव लावलेले बालपणीचे मित्र, वेळेप्रसंगी दयाळू आणि कठोरपणा ठेवणारे प्रिय शिक्षक, अशी ही सवयीची शाळा सोडून नवीन शाळेत प्रवेश करणे म्हणजे एक घर सोडून दुसऱ्या घरी जाण्यासारखेच आहे. अशीच अवस्था जांबोटी केंद्र मराठी पूर्ण प्राथमिक शाळेच्या सातवीच्या विद्यार्थांची निरोप समारंभावेळी झाली होती. शनिवारी शाळेचे स्नेह संमेलन व 7 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप अशा दुहेरी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला विविध विभागात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थांचा शाळा सुधारणा कमिटी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थांनी विविध गाण्यांवर नृत्य कला सादर करून शाळा सुधारणा कमिटी, पालक, प्रेक्षक व सर्व शिक्षकांना कलेच्या धुंदीत ठेवले होते. पण, त्याचवेळी उत्तम कला सादर करणाऱ्या सातवीच्या विद्यार्थांना सर्वांनीच जड अंतःकरणाने निरोप दिला.

विद्यार्थांची नृत्यकला म्हणजे जणू टीव्ही शो ‘च …..

       देशातील सर्वच भाषा चांगल्याच आहेत, पण मातृ भाषेत शिकणे म्हणजे जणू यशाला गवसणी घालणे होय. त्याचीच प्रचीती शनिवारच्या ऐतिहासिक जांबोटी मराठी उच्च प्राथ. शाळेच्या स्नेह संमेलनातून दिसून आली. पहिलीपासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली कला म्हणजे जणू टीव्ही शो ‘ च होता. जवळपास पाचशेहून अधिक पालक प्रेक्षकांच्या साक्षीने भरलेले शाळेचे मैदान सांगून गेले की, मातृ भाषेतील कला ही सुंदरच असते! सर्वच विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक नृत्य सादर करून तब्बल चार तास सर्वांनाच गुंतवून ठेवले. यावेळी सर्वच नृत्य चमकली अन् त्याचवेळी संस्कृती जतन करण्यासाठी मराठी शाळांचे वैभव टिकले पाहिजेत याचेही नृत्य कलेतून सादरीकरण झाले.

छावा’ नाटकाने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना विद्यार्थ्यांकडून अभिवादन;  मराठी शाळेकडूनच संस्कृतीचे जतन होते हे सिद्ध…

          हिंदवी स्वराज्याचे दुसरे धनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांवर  ‘छावा’  या प्रसिद्ध इतिहासकार शिवाजी सावंत यांच्या  कादंबरीवर आधारित मागच्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या ‘छावा’ चित्रपटाचे विद्यार्थांनी कार्यक्रमाच्या शेवटी जशास तसे सादरीकरण केले. यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महारांच्याच्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता. यावरून माय मराठी शाळेत देश संस्कृतीचे जतन कसे करावे याचे बाळकडू मराठी शाळेतच पाजले जाते हेच यावरून सिद्ध होते. संगमेश्वर येथील देसाई वाड्यात सर्व हिंदवी स्वराज्याच्या राजांची बैठक घेण्यासाठी थांबलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबतीत औरंगजेबला भेटलेल्या काही दगाबाज हिंदवी स्वराज्यातील सुभेदार तेही खुद्द महाराजांच्या मेहुण्यांकडूनच दगाफटका झाला अन् त्यावेळी महाराज कैद झाले. त्यानंतर त्यांच्यावर सलग चाळीस दिवस झालेल्या अन्याय अत्याचारांचे यावेळी उत्तमरित्या सादरीकरण करण्यात आले. याला मुख्याध्यापक सर्व सहशिक्षक, शाळा सुधारणा कमिटी, नृत्य आणि नाटकासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचेच मोलाचे सहकार्य लाभले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *