,

काँग्रेस सरकारच्या ‘गृहलक्ष्मी’ योजनेमुळे महिला बनल्या ‘ व्यवसायिक ‘


राज्य सरकारच्या पंच्यहमी गॅरंटी योजनांमुळे नागरीक आणि महिलांचे जीवनमान सुधारल्याचे नागरिकांचे मत; नंदगडात  जिल्हा व तालुका पंच्यहमी गॅरंटी योजना समितीचा परीक्षण कार्यक्रम संपन्न...

नंदगड: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

             निवडणुकीच्या आधी काँग्रेसने जाहीर केलेल्या पंच्यहमी गॅरंटी योजना सरकार येताच प्रत्यक्षात सत्यात उतरवल्या आहेत, त्यामुळे नागरिकांचे जीवनमान कमालीचे बदलले असून, यात विशेष म्हणजे गृहलक्ष्मी योजनेमुळे महिला व्यवसायिक बनल्याचे मत नागरीक आणि खुद्द महिलांनी बोलतांना व्यक्त केले. नंदगड (ता. खानापूर) येथे जिल्हा आणि तालुका पंच्यहमी गॅरंटी योजना समितीच्यावतीने योजना परीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पंच्यहमी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते. प्रकाश मादार यांनी स्वागत केले. व्यासपिठावर जिल्हा गॅरंटी योजना समितीचे अध्यक्ष विनय नावलगट्टी, जिल्हा उपाध्यक्ष रुद्रया हिरेमठ, टीपी ईओ रमेश मेत्री, नंदगड ग्रा. पं. यल्लाप्पा गुरव, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महांतेश राऊत, कसबा नंदगड पंचायतीचे अध्यक्ष नेत्रवती लोहार, मार्केटींग सोसा. अध्यक्ष श्रीशैल्य माटोळी, गॅरंटी योजनेचे सदस्य – तालुक्यातील नागरीक उपस्थित होते.

  

काँग्रेसने करून दाखवले; जिल्हा अध्यक्ष विनय नावगट्टी…

      ‘ बोले तैसा चाले त्याची वृंदावी पाऊले ‘ या उक्तीप्रमाणे निवडणुकीच्याआधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता काँग्रेस सरकारने केली असून, त्यामुळे नागरिकांचे आणि विशेष म्हणजे महिलांचे जीवनमान सुधारले आहे, गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, युवा निधी आणि शक्ती योजना अशा पंच्यहमी गॅरंटी योजना संपूर्ण देशातच लोकप्रिय ठरल्या आहेत असे, मत  पंच्यहमी गॅरंटी योजना जिल्हा अध्यक्ष विंत नावलगट्टी यांनी मांडले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, या योजनांमुळे सर्वांचेच जीवन सुखकर झाले असे सांगनाच काँग्रेसवर सर्वांनी ठाम विश्वास ठेवावा असे कार्य आमच्या सरकारने करून दाखवले आहे.

..योजनांवर आमचे बारीक लक्ष: तालुका गॅरंटी योजना अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी….

          सरकारने पंच्यहमी गॅरंटी योजना गोर गरीब जनतेसाठी शिवाय महिला स्वावलंबी बनाव्यात म्हणून आणल्या आहेत, शिवाय त्या योजना तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर योजना समित्या स्थापन केल्या आहेत. मा. पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि एआयसीसी सचिव तथा मा. आ. डॉ.अंजली निंबाळकर यांच्या सूचनेनुसार आमच्या तालुक्यात योजना समिती स्थापन केली आहे, या समितीच्या माध्यमातून प्रत्येक योजनेवर आमचे बारीक लक्ष असल्याचे मत  पंच्यहमी गॅरंटी योजना तालुका योजना समिती अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी मांडले. पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, अन्नभाग्य योजनेत येणाऱ्या रेशन वाटप, शक्ती योजनेअंतर्गत बस फ्री प्रवास योजनेस इतर दोन्हीं योजना सर्व नागरिकांपर्यंत कशा पोचतील यासाठी गावोगावी जवून आमजी प्रयत्न केले आहेत.

गृहलक्ष्मी योजनेमुळे महिलांनी थाटले छोटे -मोठे उद्योग…

        पंच्यहमी योजनेमधील गृहलक्ष्मी योजनेतून म्हिकानी छोटे मोठे उद्योग थाटले असल्याचे मत दीपा बी , यांनी मांडले. तर निर्मला देसाई, लक्ष्मी राउत, प्रार्थना नाईक यांनी सरकारच्या योजनांमुळे अर्थिक मदत होत असून, इतर महिलांनीही व्यवसायिक बनावे असे आवाहन केले. सूत्रसंचालन काशीम हट्टीहोळी यांनी केले तर बाबू हतरवाड यांनी आभार मानण्यात.

     

       


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *